एका पराभवाने खचणार नाही
ज्ञानदेव रांजणे; आंबेघरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा
कास, ता. २२ ः मी आतापर्यंत अनेक निवडणुका लढविल्या असून, एका पराभवाने खचणार नाही. पुन्हा नव्याने जोमाने कामाला लागून लोकांसाठी राबण्याची आमची तयारी असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी केले.
आंबेघर तर्फ मेढा येथे कुसुंबी गटातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. श्री. रांजणे म्हणाले, मुंबईवरून येऊन चार दिवस निवडणुकांपुरते राहून पर्यटन करणारे आम्ही नसून जनतेच्या सुखदुःखात २४ तास इथेच राहून आम्ही काम करत आहोत. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वात तालुक्यामध्ये कोट्यवधींची विकासकामे झाली असतानाही विरोधकांचे एकही काम नसताना त्यांना यश मिळाले. हा आपण आपले काम लोकांपर्यंत न पोहोचवल्याचा परिणाम आहे. यापुढील काळात विरोधक दिलेली आश्वासने पूर्ण करताहेत किंवा नाही, यासाठी तुम्ही कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. नाही तर विकास आपण करायचा आणि त्याचे श्रेय दुसऱ्यांनी घ्यायचे, असं होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी जागरूक राहिले पाहिजे. निवडणुका संपल्या असल्या तरी आगामी काळात शिवेंद्रसिंहराजे यांचे हात भक्कम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी खचून न जाता कामाला लागावे, मी तुमच्या पाठीमागे खंबीर आहे, असेही शेवटी त्यांनी सांगितले.
B04588
आंबेघर तर्फ मेढा : कुसुंबी गटातील भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना ज्ञानदेव रांजणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.