Raj Thackeray sakal
पुणे

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी निवडले साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि लेखणीचा समावेश

‘आज महाराष्ट्राच्या राजकारणाची ‘सर्कस’ झाली आहे. कोणी विदुषकी चाळे करते आहे; तर कोणी मंत्रालयात जाळ्यांवर उड्या मारत आहेत. राजकारणातील भाषेने अतिशय खालचा स्तर गाठला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘आज महाराष्ट्राच्या राजकारणाची ‘सर्कस’ झाली आहे. कोणी विदुषकी चाळे करते आहे; तर कोणी मंत्रालयात जाळ्यांवर उड्या मारत आहेत. राजकारणातील भाषेने अतिशय खालचा स्तर गाठला आहे. अशावेळी राजकारण्यांचे कान उपटण्याचे आणि त्यांना वठणीवर आणण्याचे काम साहित्यिकांनी करावे’, अशी अपेक्षा मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी व्यक्त केली.

दिल्ली येथे होणाऱ्या आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष प्रकाश पागे, संमेलनाची संयोजक संस्था असलेल्या ‘सरहद, पुणे’चे अध्यक्ष संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ‘‘एकेकाळी साहित्यिकांमध्ये ‘मराठी बाणा’ होता, राजकारण्यांना अधिकारवाणीने चांगल्या गोष्टी ठणकावून सांगण्याची हिंमत आणि धमक होती. आज ती कमी झालेली दिसते. पण अधिकारवाणीने राजकारण्यांना चार गोष्टी सांगण्याचे काम साहित्यिकांचे आहे. त्यासाठी त्यांनी सामाजिक चळवळ उभी करावी. साहित्यिकांनी ट्रोल होण्याची भीती बाळगू नये. त्यांनी राजकारणाची ही पातळी सुधरवली नाही तर; भविष्यात या क्षेत्रात येणाऱ्या पिढीचा ‘राजकारण असेच करायचे असते’, असा समज होण्याची भीती आहे.’

‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पत्र पाठवणारे राज ठाकरे हे पहिले राजकारणी होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेनेही यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला’, असे प्रा. जोशी यांनी सांगितले. ‘राज ठाकरे यांनी निवडलेल्या संमेलनाच्या बोधचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि लेखणी आहे.

मराठ्यांनी यापूर्वीही दिल्ली काबीज केली आहे. पण या वेळी होणारा हल्ला मात्र पेनाने आणि प्रेमाने होणार आहे’, असे नहार यांनी सांगितले. संमेलनाचे बोधचिन्ह तयार करणाऱ्या प्रसाद गवळी यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. वंदना चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. लेशपाल जवळगे यांनी आभार मानले.

‘राजकारण्यांना ऐकायला बोलवा, बोलायला नको’

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांची होणाऱ्या गर्दीबाबत नेहमीच टीका होत असते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे म्हणाले, ‘साहित्यिकांनी सांगायचे आणि राजकारण्यांनी ऐकायचे, अशीच परिस्थिती नेहमी असायला हवी. त्यामुळे साहित्य संमेलनातही राजकारण्यांना तुमचे विचार ऐकायला बोलवा, बोलायला नको.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT