pani 
पुणे

पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार; दलित वस्तीसाठी वेगळी टाकी अन् पाण्यातून अळ्या

सकाळ वृत्तसेवा

वडापुरी (पुणे) : काटी (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतअंतर्गत पाणीपुरवठा केला जात आहे; परंतु पाणीपुरवठा करणाऱ्या नळातून दलित वस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाण्यात मोठ्या प्रमाणात अळ्या आल्याने घबराट पसरली आहे.

दोन ठिकाणच्या विहिरींवरून गावकऱ्यांना पाणीपुरवठा होतो. यापैकी दलित वस्तीच्या हद्दीतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी वेगळी पाण्याची टाकी आहे. 2016 मध्ये ही पाण्याची टाकी बांधल्याची माहिती येथील रहिवासी एस. व्ही. भोसले यांनी दिली. परंतु बांधलेल्या दिवसापासून येथील पाण्याची टाकी कधीही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात आलेली नाही. सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय माने म्हणाले, की दलित वस्तीतील नागरिकांना ग्रामपंचायतीकडून अशुद्ध पाणीपुरवठा होत असून, पाण्यातून अळ्या येत असल्याच्या वारंवार तक्रारी केल्या. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने कोणताही ठोस उपाय केला नसल्याने इंदापूरचे तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहे. ग्रामसेवक खरमाटे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

संबंधित गावकऱ्यांनी आमच्या कार्यालयाकडे तशा आशयाची तक्रार दाखल केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू व गावाला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी लेखी सूचना करू.
- विजयराव परीट, गटविकास अधिकारी, इंदापूर पंचायत समिती

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT