पुणे

हंगाम बहरल्याने डाळिंबाची वाढली आवक, दर घसरले

CD

डाळिंबाच्या दरात १५ दिवसांत
तब्बल ६० रुपयांची घसरण

- दर प्रतिकिलो १८० वरून १२० रुपयांपर्यंत गडगडले
- व्यापाऱ्यांकडून कमी भाव, उधारीची मागणी, निर्यातीच्या अडचणींचा फटका

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : काही दिवसांपूर्वी डाळिंबासाठी व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येत होते. आज मात्र परिस्थिती उलटी झाली आहे. हंगाम बहरल्याने बाजारात डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून, शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी व्यापाऱ्यांच्या दारात हेलपाटे मारावे लागत आहेत. वाढलेल्या आवकेमुळे १५ दिवसांपूर्वी सोलापूरच्या बाजारात प्रतिकिलो १८० रुपयांपर्यंत असलेला दर आता १२० रुपयांपर्यंत घसरल्याने डाळिंब उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत.
गत महिन्याच्या अखेरीस सोलापूर बाजारात सुमारे १३० टन डाळिंबाची आवक होती. ती आता २६६ टनांवर पोहोचली आहे. स्थानिक मालाबरोबरच अहिल्यानगर, इंदापूर व बीड जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणावर डाळिंब बाजारात येत आहे. पुण्याच्या गुलटेकडी बाजार समितीत रविवारी (ता. २) १०० टन आवक झाली होती. त्यावेळी प्रतवारीनुसार प्रतिकिलो ४० ते १५० रुपये दर होता. बुधवारी (ता. ५) आवक २११ टनांवर गेल्यानंतर प्रतिकिलो दर १५ ते १०० रुपयांपर्यंत खाली आला.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बाजारातील वाढलेली आवक आणि युद्धामुळे निर्यातीत अडथळे येत असल्याचे कारण पुढे करून व्यापारी कमी दराने मालाची मागणी करत आहेत. अनेक व्यापारी उधारीवर माल घेत असून, निर्यातक्षम दर्जाच्या मालातून प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांचा नफा कमावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे मृग व हस्त बहाराचे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आंबे बहार धरला होता. त्यामुळे यंदा बहुतांश बागांतील माल एकाच वेळी काढणीला आला आहे. पिकलेली फळे झाडावर गळू लागल्याने शेतकरी घाईघाईने विक्री करत आहेत; मात्र बाजारातून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांची अडचण वाढली आहे.
जिल्ह्यातील सोलापूर, पंढरपूर व सांगोला बाजारांसह थेट शेतकऱ्यांकडून दररोज सुमारे तीन ते चार हजार टन डाळिंबाची विक्री होत आहे. जत व आटपाडी (जि. सांगली) परिसरातील मालही या बाजारांत येत आहे. वाढलेल्या आवकेमुळे आता वजनाऐवजी क्रेटवर खरेदी होत असून, २० किलो क्षमतेच्या एका क्रेटला २०० ते ९०० रुपये दर मिळत आहे.

चौकट
निर्यातीच्या अडथळ्याचे कारण पुढे
बाजारात मालाची वाढलेली आवक आणि युद्धामुळे निर्यातीत येणाऱ्या अडचणींचा आधार घेत व्यापारी दर पाडत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. पूर्वी व्यापारी स्वतः शेतकऱ्यांकडे माल खरेदीसाठी जात होते. आता मात्र शेतकऱ्यांनाच व्यापाऱ्यांकडे जावे लागत आहे. अनेक व्यापारी प्रतिकिलो ५० ते ७० रुपये भावाने माल मागत असून, उधारीवर मालाची मागणी करत आहेत.

PNE26W40248
एक एकर बागेसाठी शेडनेटवर सुमारे ७० हजार रुपये खर्च केला. आता माल काढणीला आला असून, गळती सुरू आहे. त्यात व्यापारी कमी दराने माल मागत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
- अप्पासाहेब खंडागळे, शेतकरी, संगेवाडी, ता. सांगोला

PNE26W40249
१५ दिवसांपूर्वी डाळिंबाला प्रतिकिलो १८० रुपयांपर्यंत दर होता. मात्र, आवक वाढल्याने सध्या प्रतिकिलो १२० रुपयांपर्यंत दर घसरले आहेत. जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणावर माल येत आहे.
- इक्बाल बागवान, आडत व्यापारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT