पुणे

नगर- डाळिंब परिषदत शास्त्रज्ञांचा गौरव

CD

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या
शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांचा गौरव

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांसह पदव्युत्तर विद्यार्थ्याने उत्कृष्ट संशोधनपर सादरीकरण केले. पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेत वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे, उद्यानविद्यावेत्ता डॉ. एस. पी. गायकवाड आणि कीटकशास्त्र विषयातील पीएचडीचे विद्यार्थी दुर्गेश नरवाडे यांच्या सादरीकरणाचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय परिषद डाळिंब संशोधनाच्या प्रगतीसाठी कार्यरत संस्था, सोलापूर आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद-राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या सहकार्याने पुणे येथे ६ ते ८ सप्टेंबर अशी तीन दिवस आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद झाली.

या परिषदेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे यांनी ‘हवामानावर आधारित डाळिंबातील अँथ्रॅक्नोज रोगाचा शास्त्रीय अभ्यास व पूर्वानुमानाद्वारे हवामान-सक्षम डाळिंब उत्पादन’ या विषयावर मौखिक सादरीकरण केले. हवामानातील विविध घटकांचा डाळिंबातील अँथ्रॅक्नोज रोगाच्या प्रादुर्भावाशी असलेला संबंध आणि रोगाच्या पूर्वानुमानाच्या दृष्टीने या संशोधनाला विशेष महत्त्व आहे.

उद्यानविद्यावेत्ता डॉ. एस. पी. गायकवाड यांनी ‘अर्धशुष्क परिसंस्थेत अधिक उत्पादनक्षमता व उत्कृष्ट फळगुणवत्तेसाठी गोड डाळिंबाच्या वाणांचे कार्यक्षमता मूल्यमापन’ या विषयावर पोस्टर सादरीकरण केले. अर्धशुष्क हवामानामध्ये योग्य गोड डाळिंब वाणांची निवड, उत्पादनक्षमता आणि फळांची गुणवत्ता या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण आहे.

कीटकशास्त्र विषयातील पीएचडीचे विद्यार्थी दुर्गेश नरवाडे यांनी ‘तापासून फळापर्यंत : डाळिंबातील कीटकनाशक अवशेषांचे एकात्मिक मूल्यांकन’ या विषयावर पोस्टर सादरीकरण केले. डाळिंबातील कीटकनाशक अवशेषांचे मूल्यांकन आणि सुरक्षित डाळिंब उत्पादनाच्या दृष्टीने त्यांच्या संशोधनाला विशेष महत्त्व आहे.

या तिन्ही संशोधकांचे संशोधन डाळिंब उत्पादनातील रोग व्यवस्थापन, वाण निवड, उत्पादन व फळगुणवत्ता तसेच सुरक्षित अन्न उत्पादन या विविध महत्त्वपूर्ण बाबींशी संबंधित आहे. त्यामुळे एकाच आंतरराष्ट्रीय परिषदेत तीन वेगवेगळ्या विषयांवर उत्कृष्ट सादरीकरण पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला. त्याबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे व अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT