पुणे

नगर ः नोंबीडी शिवारात डाळिंबाची चोरी

CD

नोंबीडी शिवारात डाळिंबाची चोरी
----
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील निंबोडी शिवारातील एका शेतातून तब्बल ४० हजार रुपये किमतीची डाळिंबे चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. निंबोडी येथील शेतकरी जोगेश बालचंद गवळी (वय ४४) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बाजारात डाळिंबाला चांगला दर आहे. त्यामुळे चोरट्यांच्या नजरा आता डाळिंबावर गेल्या आहेत. जिल्ह्यात यापूर्वीही अशा चोरीच्या घटना घडल्या. १६ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान अहिल्यानगर तालुक्यातील निंबोडी शिवारात जोगेश गवळी यांच्या शेतात ही चोरी झाली. आरोपींनी शेतातील डाळिंबे परस्पर तोडून नेल्याचा प्रकार उघड झाला. चोरीला गेलेल्या डाळिंबाचे वजन सुमारे ८०० किलो असून, त्याची बाजारातील किंमत ४० हजार रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Brand Value: क्रिकेटमधून रिटायर, पण जाहिरातीत धोनीचाच जलवा! विराट, रोहित अन् सचिनलाही टाकले मागे

उद्या शुक्राचं स्वराशीत पुनरागमन! ५ राशींचं नशीब पालटणार; पैसा, प्रेम आणि नोकरीत मिळणार लाभ

Latest Marathi News Live Update : अक्कलकुवा आणि नवापूर येथे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

IND A vs PAK A: नेपाळला लोळवल्यानंतर आता पाकिस्तानशी भिडणार भारत! वैभव सूर्यवंशीसह कोणाला मिळणार संधी? पाहा संभाव्य Playing XI

Viral Video: जिल्हाधिकारी शीला दाहिमा यांचा हटके अंदाज; 'दिल्लीवाली गर्लफ्रेंड' गाण्यावर थिरकल्या

SCROLL FOR NEXT