Pooja Chavan Arun Rathod Heaven Park Wanwadi Pune 
पुणे

पूजाच्या हत्येचा कट? रूम भाड्याचा करार ते आत्महत्या; घटनाक्रमामुळे संशय

सागर आव्हाड

पुणे : पूजा चव्हाण हिच्या मृत्यचं गूढ अजून कायम असून गुंतागुंत वाढत आहे. पुजा राहात असलेल्या 'हेवन पार्क' सोसायटीतील रहिवासी याबाबत काही बोलायला तयार नाहीत आणि जे बोलत आहे तेही अर्धवट.  रहिवाशांवर कोणाचा दबाव आहे का? पूजा चव्हाण 30 जानेवारीला पुण्यातील 'हेवन पार्क'मध्ये राहायला आली होती आणि 7 दिवसांमध्ये तिने उडी मारुन आत्महत्या केली. पूजाच्या मृत्यूनंतरही तिची दुचाकी गाडी अजूनही पार्किंगमध्ये आहे.  

टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; राज्यातील मंत्री अडचणीत ?

'हेवन' याचा अर्थ स्वर्ग असा होता आणि पूजा याच ठिकाणी स्वर्गवासी झाली. याबाबत रूम मालक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवरीला अरुण राठोड याला 11 महिने करार करून फ्लॅट  भाड्याने दिला होता. 15 हजार डिपॉझिट व 6 हजार रूम भाडही ठरलं होतं.1 जानेवरीला अरुण राठोड हा हेवन पार्कमध्ये राहायला आला होता. त्याच्या सोबत त्याचा मित्र ही आला होता. 30 जानेवारीला पूजा त्या फ्लॅटवर राहायला आली होती. दरम्यान, फ्लॅटवर मुलगी राहत असल्याची समजताच त्यांनी रूमवर जाऊन चौकशीही केली तेव्हा अरुण राठोड व पूजा चव्हाण हे भाऊ बहीण नसल्याचं समजलं. त्यानंतर त्यांना रूम खाली करायला सांगितली. लगेच रुम मिळणार नसल्याचं  असे सांगून अरुण याने 10 दिवसाची मुदत घेतली होती आणि याच दरम्यान, हा प्रकार घडला.

कोण आहे टिक-टॉक स्टार पुजा चव्हाण?

दरम्यान, याबाबत बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना कोणतीही माहिती नव्हती. मात्र, पूजा चव्हाणच्या शेजारील एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ''1 महिने झाला होता 2 मुलं राहात होती. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा समजलं की, त्यांच्या बरोबर मुलगीही राहतेय. आम्ही कधी बोलोही नाही पण, ते कधी तरी दिसत होते. या प्रकरणात शेजारी किंवा इतर कोणी काहीच माहिती देत नसल्याने कोणाचा दबाव आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. अरुण राठोड हा कुठं तरी कामाला जात होता. एक महिन्यापासून पूजाच्या हत्येचा कट तर झाला नव्हता ना? अस प्रश्न उपस्थित होतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart Sale : डीमार्टमध्ये कोणत्या दिवशी वस्तू खरेदी करणे जास्त स्वस्त आणि फायद्याचे ठरते? जाणून घ्या एका क्लिकवर

Bihar Government: गृहखातं हातातून निसटलं, पण 'हे' मलाईदार विभाग नितीश कुमारांच्या 'जेडीयू'कडे

Sale : सारा जमाना Zudio का दिवाना! पण फक्त झुडिओ नाही, तर टाटाच्या 'या' 5 दुकानांमध्ये मिळतोय हजारोंचा डिस्काउंट; स्पेशल ऑफर्स पाहा

Gondia Crime : वडिलाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचार पीडित मुलीने एका बाळाला दिला जन्म

Gadchiroli News : मारेदुमिल्ली जंगलातील चकमक ‘खोटी कथा’; आमच्या कार्यकर्त्यांना बनावट एनकाउंटरमध्ये मारले—माओवादी पत्रकाचा आरोप!

SCROLL FOR NEXT