pooja chavan detailed postmortem report
pooja chavan detailed postmortem report 
पुणे

पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला; मृत्यूविषयी सस्पेन्स कायम!

सकाळ डिजिटल टीम

पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या घटनेस 22 दिवस उलटले, मात्र अजूनही तिची आत्महत्या आहे की घातपात, याचा अजूनही उलगडा झालेला नाही. आत्महत्येच्या किमान मुळ कारणापर्यंत पोचू शकणारा सविस्तर शवविच्छेदन अहवालही वानवडी पोलिसांना प्राप्त झाला आहे. मात्र त्यामध्येही मणक्‍याला व डोक्‍याला जबर दुखापत झाल्यामुळेच मृत्यु झाल्याचे कारण देण्यात आले आहे.

पूजा चव्हाण हिने 7 फेब्रुवारीला मध्यरात्री वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर टिकटॉकवर "स्टार' असलेल्या पूजा चाहत्यांना मोठा धक्का बसला. तर पूजा चव्हाण हिच्याशी संबंध असल्याच्या कारणावरुन भाजपने वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरला. अखेर राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, पुणे पोलिसांनी राष्ट्रीय महिला आयोगासह राज्याच्या पोलिस महासंचालकांना चौकशी अहवाल पाठविला, मात्र त्यामध्ये नेमके काय नमूद केले आहे, याचाही उलगडा करण्यात आला नाही.

दरम्यान, पूजाची लहान बहिणी दिया चव्हाण हिने इन्स्टाग्रामवर 13 फेब्रुवारीला केलेली पोस्ट आणि तिच्या चुलत आजीकडून पजाचा खून करण्यात आला असल्याचा सातत्याने केला जाणारा आरोप, या कारणामुळे पूजाची आत्महत्या आहे, की घातपात या प्रश्‍नाला खतपाणी मिळू लागले. पूजाच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल वानवडी पोलिसांना यापूर्वी मिळाला आहे, त्यामध्ये तिच्या डोक्‍याला व मणक्‍याला जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे नमूद केले असल्याचे वानवडी पोलिसांनी यापूर्वीच स्पष्ट केले. दरम्यान, सविस्तर शवविच्छेदन अहवाल वानवडी पोलिसांना नुकताच मिळाला.

आत्महत्येच्या घटनेस 22 दिवस उलटले, त्यामुळे आत्तापर्यंत सविस्तर शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळणे अपेक्षित होते. त्यानुसार, काही दिवसांपूर्वीच पोलिसांना हा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्येही पहिल्या अहवालाप्रमाणेच डोक्‍याला व मणक्‍याला जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यु झाल्याचे नमूद केले असल्याचे वानवडी पोलिसांनी स्पष्ट केले.

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आम्हाला प्राप्त झाला होता, त्यामध्ये डोक्‍याला व मणक्‍याला जबर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद केले होते. त्यानंतर शवविच्छेदनाचा दुसरा सविस्तर अहवालही प्राप्त झाला आहे. त्यामध्येही पहिल्या अहवालात मृत्युचे नमूद केलेले कारण देण्यात आले आहे. त्यामध्ये शवविच्छेदनाच्या पाहणीचा उल्लेख आहे, तो उल्लेख सांगता येत नाही.
- दिपक लगड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी पोलिस ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT