Manorama Khedkar Parents Esakal
पुणे

Pooja Kedkar Case: मनोरमा खेडकरांची येरवडा कारागृहात रवानगी

Pune: खेडकर यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी जामीन मिळवण्यासाठी पौड न्यायालयात अर्ज केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Maharashtra News: मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्या प्रकरणी भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांची सोमवारी (ता. २२) येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पौड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बरडे यांनी खेडकर यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी खेडकर यांची आई मनोरमा, वडील दिलीप, अंगरक्षकासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत शेतकरी पांडुरंग कोंडिबा पासलकर (वय ६५, रा. केडगाव, दौंड) यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या मनोरमा यांना महाड परिसरातून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली.

न्यायालयाने शनिवारी (ता. १९) मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली होती. कोठडीची मुदत संपल्याने खेडकर यांना पौड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने खेडकर यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली. दरम्यान, खेडकर यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी जामीन मिळवण्यासाठी पौड न्यायालयात अर्ज केला आहे.

धमकाविण्यासाठी वापरलेले पिस्तूल आणि काडतुसे जप्त

मुळशीत शेतकऱ्याला धमकाविल्याप्रकरणी खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. खेडकर यांच्या बंगल्यातून शेतकऱ्याला धमकाविण्यासाठी वापरलेले पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी त्यांना शस्त्रपरवाना रद्द का करू नये, अशी नोटीसही बजाविली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT