IAS Pooja Khedkar sakal
पुणे

Pooja Khedkar : पूजा खेडकरला दिव्यांग प्रमाणपत्र देणारा डॉक्टर निर्दोष; वायसीएम हॉस्पिटलचा पुणे जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट

Trainee IAS officer : ''आम्ही संबंधित डॉक्टरांकडून पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल अहवाल मागितला होता. त्यात त्यांनी पूजा खेडकरची योग्य तपासणी करून शासकीय निकषानुसार तिला 7% दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र दिलं होतं. मात्र त्या प्रमाणपत्राच्या आधारे तिला शिक्षणात किंवा शासकीय नोकरीत कोणताही लाभ घेता येत नाही.''

संतोष कानडे

Pooja Khedkar Latest News : यूपीएससीकडून कारवाई करण्यात आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर हिच्याबद्दल आणखी एक माहिती पुढे येत आहे. पुजाने जे प्रमाणपत्र पिंपरी चिंचवडच्या वायसीएम हॉस्पिटलमधून मिळवलं होतं, त्या प्रमाणपत्रावर तिला ना शिक्षणात लाभ घेता येत होता ना नोकरीत. त्यामुळे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर निर्दोष असल्याचा रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे.

पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलला दिले होते. त्या आदेशानुसार वायसीएम हॉस्पिटलमधील डॉक्टर हे निर्दोष असल्याची टिपण्णी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी केली आहे.

''आम्ही संबंधित डॉक्टरांकडून पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल अहवाल मागितला होता. त्यात त्यांनी पूजा खेडकरची योग्य तपासणी करून शासकीय निकषानुसार तिला 7% दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र दिलं होतं. मात्र त्या प्रमाणपत्राच्या आधारे तिला शिक्षणात किंवा शासकीय नोकरीत कोणताही लाभ घेता येत नाही.'' असं स्पष्टीकरण वायसीएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी दिलं आहे.

पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी राशन कार्डचा जो बनावट पत्ता सादर केला होता त्याविषयी आम्ही काही कायदेशीर कारवाई करू शकत नाही, या विषयाची दखल संबंधित खात्याने घ्यायला हवी असे स्पष्टीकरण राजेंद्र वाबळे यांनी दिले आहे.

दरम्यान, पूजा खेडकरवर कारवाई करत प्रशिक्षण संस्थेने तिचा प्रशिक्षण कालावधी थांबवला होता. याचबरोबर तिला मसुरी येथे रिपोर्ट करण्यास सांगितलं होतं. परंतु पुजा खेडकर मसुरीला गेलीच नाही. दुसरीकडे पुजा खेडकवर यूपीएससीने गुन्हा दाखल केला आहे. नाव बदलून परीक्षा देण्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT