pooja khedkar mom sakal
पुणे

Pooja Khedkar: खेडकर कुटुंबाला अजून एक धक्का, 'या' मिळकतीवर मनपाने लावले सील

सकाळ डिजिटल टीम

तळवडेतील कंपनी ‘सील’

पिंपरी, ता. १९ ः पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा यांच्या नावावरील तळवडे येथील थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग कंपनीला मिळकतकर थकविल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन आणि करआकारणी विभागाने शुक्रवारी टाळे ठोकले.

मनोरमा या कंपनीच्या भोगवटादार आहेत. कंपनीच्या संचालकांनी महापालिकेचा दोन लाख ७७ हजार ७८१ रुपये मिळकतकर थकविला आहे. शिवाय, ही कंपनी देहूरोड दारुगोळा कारखान्याच्या रेडझोन हद्दीत येते. महापालिकेने यासंदर्भातील सर्व कागदपत्रे तपासली आहेत. कंपनीमार्फत २००९ पासून व्यावसायिक कर भरला जात होता. शेवटचा कर २०२२ मध्ये भरला आहे. प्रशासन अधिकारी नाना मोरे, एल. एम. काळे यांच्या उपस्थितीत कारवाई झाली.

अशी आहे नोटीस

कंपनीच्या प्रवेशद्वारावर चिकटवलेल्या नोटिशीमध्ये महापालिकेने म्हटले आहे की, मालमत्ता क्रमांक १४/३/४३६ चे मालक व भोगवटादार यांनी कर थकबाकी रक्कम भरलेली नाही. म्हणून सदर मालमत्ता जप्त करण्याची व तिची विक्री करण्याचे अधिपत्र सहायक आयुक्तांनी दिल्याने सदर मालमत्ता आज १९/७/२०२४ रोजी दुपारी १२.४५ वाजता जप्त केली आहे. त्यामुळे या नोटीसद्वारे संबंधितांना कळविण्यात येते की, या मालमत्तेचे संबंधितांनी हस्तांतरण करण्यास तसेच, त्यापासून लाभ मिळविण्यास मनाई करण्यात येत आहे. ही स्थावर मालमत्ता जप्त केल्यामुळे मालमत्ता कर बिलाचे थकबाकीपोटी येणे असलेली रक्कम एक लाख ९६ हजार ८६० रुपये, त्यावरील दंड व जप्ती वॉरंट शुल्क रक्कम २१ दिवसाच्या आत भरणा करावी, अन्यथा सदर मिळकतीचा जाहीर लिलाव केला जाईल.

फौजदारी कारवाईचा इशारा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर महापालिकेच्या तळवडे करसंकलन विभागीय कार्यालयाने नोटीस बजावली आहे. त्यात म्हटले आहे की, सदरची मिळकत महापालिकेने जप्त केली असून, त्यास सिल केलेले आहे. बेकायदेशीरपणे सदरचे सिल तोडून मिळकतीमध्ये कुणीही प्रवेश केल्यास कायदेशीर फौजदारी कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : सकाळी ६ वाजता पुन्हा सुरू झाला डी जे चा दणदणाट, पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष अखंड

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT