पुणे

आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी-पारगाव रस्त्यावरील पुलाला भगदाड

सुदाम बिडकर

पारगाव : जारकरवाडी (ता. आंबेगाव) ते पारगाव रस्त्यावरील साकव पुलाला मोठे भगदाड पडल्याने हा रस्ता वहातुकीसाठी धोकादायक बनला आहे.

दरम्यान, परिसरात दोन आठवड्यापुर्वी ढगफुटी होऊन मुसळधार पाऊस झाला या पावसाने ओढ्या नाल्यांना पुर आला होता, पुरामुळे शेतजमीनीचे तसेच शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पुरामुळे जारकरवाडी वरुन बिरोबा मंदिर मार्गे पारगावला जाताना खुडेवस्ती जवळ असलेल्या  साकव पुलाला मोठ्या अकाराचे भगदाड पडले आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्याने मोटारसायकलस्वारांना अपघात घडू शकतो. भगदाड मोठ्या आकाराचे असल्याने मोठ्या वाहन चालकांना सुध्दा या साकव पुलावरुन सावकाश वाहन न्यावे लागत आहे.

पारगाव हे तालुक्याच्या पुर्वभागातील मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी दोन मोठी खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणात येणे जाणे असते पारगाव येथील भीमाशंकर साखर कारखान्यामुळे ऊस वहातुक करणारी वाहनेही याच रस्त्याने जात असतात जारकरवाडी परिसरातील शेकडो विद्यार्थी दररोज महाविद्यालयीन शिक्षणासाठी पारगाव येथे जात असतात. 

दरम्यान, या रस्त्याचे काही वर्षापुर्वी डांबरीकरण झाले होते. या साकव पुलाची उंची कमी त्यातच पाईपची संख्या कमी असल्याने मोठ्या प्रमाणात पुर आल्यास पुराचे पाणी पुलावरुन जाते त्यामुळे पुलाचे नुकसान होत असते. या वर्षीच्या पुराने तर मोठे भगदाड पडले आहे त्यामुळे या साकव पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी येथील सहकारी सोसायटीचे सचिव व उद्योजक नवनाथ मंचरे यांनी केली आहे. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT