Treatment
Treatment 
पुणे

गरीब रुग्णांवर उपचाराचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील रुग्णालयांनी गरीब रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिल्यानंतर अखेर रुग्णालयांची देणी फेडण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. शहरी गरीब योजनेतील रुग्णालयांना १५ कोटी रुपये तातडीने देण्यात येणार असून, त्यामुळे रुग्णांना उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी दहा दिवसांचा अवधी असल्याने तत्पूर्वी उपचार न थांबविण्याची सूचना महापालिकेने रुग्णालयांना केली आहे. 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी राबविण्यात येणाऱ्या शहरी गरीब योजनेत दरवर्षी १२ हजार कुटुंबाना आरोग्य सेवा देण्यात येते. त्यासाठी विविध खासगी ७१ रुग्णालयांशी करार केला असून, या योजनेसाठी वर्षाला २५ कोटी रुपयांची तरतूद केली जाते. परंतु, रुग्ण संख्या आणि उपचार खर्चाची मर्यादा वाढविल्याने ही तरतूद अपुरी ठरत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून गरीब रुग्णांना दाखल करून घेतलेल्या रुग्णालयांना त्यांची बिले मिळाली नव्हती. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून रुग्णांवर उपचार करण्यास नकार देत रुग्णालयांनी बिलांसाठी महापालिकेकडे तगादा लावला होता. 

या पार्श्‍वभूमीवर रुग्णालयांना बिले देण्याची मागणी सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकांत नगरसेवकांनी केली होती. या योजनेसाठी वर्गीकरणाद्वारे निधी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्यावर कार्यवाही झाली नव्हती. त्यानुसार आता १५ कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे देण्याची प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. तो पुढील आठवड्यात मंजूर होईल, असे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT