Porsche Accident news esakal
पुणे

माझा बाप बिल्डर असता तर...पुण्यात धंगेकरांकडून पोर्शे अपघातस्थळी निबंध स्पर्धा! बक्षीस रक्कम किती?

Pune Porsche crash case: पुण्यातील रस्ते अपघाताची देशभर चर्चा होत आहे. येथे भरधाव वेगात आलेल्या पोर्शे कारने मोटारसायकलला धडक दिली, यात दोघांचा मृत्यू झाला.

Sandip Kapde

माझा बाप बिल्डर असता तर...आश्वीनी आणि आदित्यचे मारेकरी कोण? या विषयावर पुण्यात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अपघात पोर्शे अपघातस्थळी निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. अनेक जणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. या निंबध स्पर्धेचे प्रथम बक्षीस 11,111 आहे.

काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर पुणे अपघात प्रकरणात सुरुवातीपासून आक्रमक आहेत. त्यांनी अनेक आंदोलन देखील केले. अल्पवयीन आरोपीला बाल हक्क न्यायालयाने प्रथम जामीन मंजूर केला तेव्हा 300 शब्द लिहण्याची शिक्षा दिली. त्यानंतर कोर्ट आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पोलिसांवर दबाव निर्माण झाल्यानंतर आरोपीला पुन्हा बाल हक्क न्यायालयात हजर करण्यात आले. आता अल्पवयीन आरोपी १४ दिवस बाल सुधारगृहात पाठण्यात आले आहे.

ज्या ठिकाणी अपघात घडला, त्या ठिकाणी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. श्रीमंतांना वेगळा न्याय आणि गरिबांना वेगळ्या न्याय, अशी परिस्थिती सध्या भारतात असल्याचे स्पर्धकांनी बोलून दाखवले.

पुण्यातील रस्ते अपघाताची देशभर चर्चा होत आहे. येथे भरधाव वेगात आलेल्या पोर्शे कारने मोटारसायकलला धडक दिली, यात दोघांचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत 17 वर्षीय अल्पवयीन कार चालवत होता. या प्रकरणात सातत्याने नवनवीन पैलू समोर येत आहेत. आता अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

यानंतर अल्पवयीन आजोबांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी कोर्टाकडे सात दिवसांची कोठडी मागितली, मात्र कोर्टाने अग्रवालला 28 मेपर्यंत कोठडी सुनावली आहे. सुरेंद्र अग्रवालवर ड्रायव्हरला धमकावून त्याचे अपहरण केल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amba Ghat Accident : आंबा घाटात भीषण अपघात; परराज्यातील बस ७० फूट दरीत कोसळली

Marathi Breaking News LIVE: आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवणाऱ्या युवकावर MPDA कारवाई

Gold Rate Today : लग्नासाठी सोनं खरेदी करताय? सोनं-चांदीच्या दरात झाले मोठे बदल...पाहा आजचे ताजे भाव

Inspirational Story: '५७ व्या वर्षी २ हजार ७०० कि.मी. सायकल प्रवास'; अनगरच्या महादेव माने गुरुजींची पंढरपूर ते घुमान २४ दिवस यात्रा..

Panchang 5 December 2025: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT