Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident: पोर्शे गाडीच्या कॅमेऱ्यातील अपघाताचा व्हिडीओ तपासणार; कल्याणीनगर अपघात प्रकरणी अतिरिक्त पोलिस आयुक्तांची माहिती

Pune Porsche Accident: पब, बारच्या परिसरात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई सुरू असल्याची माहिती देखील अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कल्याणीनगरमधील ‘हिट ॲंड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपी चालवत असलेल्या मोटारीमधील कॅमेऱ्याने टिपलेले अपघाताचे चित्रीकरण तपासण्यात येणार आहे. या चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांना गुन्ह्याच्या तपासात मदत होणार आहे.

कल्याणीनगर येथे रविवारी (ता. १९) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भरधाव आलिशान मोटारीने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात आयटी अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत दोन्ही पब, घटनास्थळ आणि येरवडा पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपीने मद्य सेवन केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. आता पोलिस त्या आलिशान मोटारीतील कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासणार आहेत. याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ ८५ जणांवर कारवाई

वाहतूक पोलिसांनी शहरातील हॉटेल्स, बार आणि पबच्या परिसरात मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे. या ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या मोहिमेत मंगळवारी (ता. २१) एकाच दिवशी ८५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्तालयात मंगळवारी आयोजित बैठकीत ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शिवाय, रस्त्यावर भरधाव वाहन चालविणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाइ करण्यात येणार असल्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी दिला आहे.

पब, बारच्या परिसरात नाकाबंदी

शहरातील परमीट रूम, पब, बारच्या परिसरात मध्यरात्री नाकाबंदी करण्यात येणार आहे. विशेषत: शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्यरात्री एक ते पहाटे तीन या कालावधीमध्ये नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT