Pune Porsche Crash  Sakal
पुणे

Pune Porsche Crash : ''माझ्या मुलाला मदत करा'' आरोपीच्या बिल्डर वडिलांचा डॉ. तावरेला फोन?, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलल्याचे समोर आले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शवागृहातील कर्मचारी अतुल घटकांबळे या तिघांना सोमवारी अटक केली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालने ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरेशी संपर्क साधून मुलाला मदत करा, असे सांगितले होते. त्यांच्यात मोठा आर्थिक व्यवहारही झाला. पोलिसांचा तपास भरकटण्याच्या उद्देशाने अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलण्याचा कट रचण्यात डॉ. तावरे हाच मास्टरमाईंड असल्याची माहिती एका अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलल्याचे समोर आले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शवागृहातील कर्मचारी अतुल घटकांबळे या तिघांना सोमवारी अटक केली होती.

न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान डॉ. तावरेने डॉ. हाळनोर आणि घटकांबळे या दोघांना तीन लाख रुपये दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. त्याला विशाल अग्रवालने ही रक्कम दिली होती का? तावरेने अग्रवालकडून किती रक्कम घेतली? डॉ. हाळनोरने दुसऱ्या कोणाच्या रक्ताचा नमुना घेतला? याबाबत तपास करण्यात येत आहे.

डॉ. अजय तावरे आणि विशाल अग्रवालचे संभाषण

ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलण्यात आला होता. त्यासाठी मुलाचे वडील विशाल अग्रवाल याने ससूनमधील डॉ. अजय तावरेला व्हाटसॲप कॉल केला होता. त्या दोघांचे संभाषण झाल्याचे मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणातून (सीडीआर) समोर आले आहे. पोलिसांनी ससून रुग्णालयातील रजिस्टर आणि आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत, असे त्यांनी सांगितले.

आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने तपास

कल्याणीनगर अपघात प्रकरणात एकूण तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलिस आयुक्तांनी मंगळवारी या तीनही गुन्ह्यांच्या तपासात समन्वय राहावा, यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या गुन्ह्यांमधील समान दुवे शोधण्यासह भक्कम पुरावे एकत्रित करण्यात येत आहेत. आरोपींना शिक्षा होण्याच्या यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

Central Railway: कर्जत-खोपोली प्रवास आरामदायी होणार, १५ डब्यांच्या लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; पाहा वेळापत्रक

Kailas Patil : ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग? कैलास पाटील शिंदे गटात जाणार?

अभिजीत खांडकेकरची मेहुणी आहे ही मराठी अभिनेत्री; गाजवतेय मालिका; म्हणते- माझ्या लग्नात त्यांनी खुर्च्या उचलल्यात...

Marathi News Live Updates : आज स्वातंत्र्यदिनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर 'बीटिंग रिट्रीट' समारंभ पार पडला

SCROLL FOR NEXT