Smart Mirror App Sakal
पुणे

आरसाच सांगणार ‘व्यायाम असा करा’

आपल्याला ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळेल का अशी चाचपणी घरगुती व्यायाम करणाऱ्यांकडून होत आहे. या सर्वांसाठी पोर्टल या स्टार्टअपचे ‘स्मार्ट मिरर’ महत्त्वाचे ठरत आहे.

सकाळ वृत्तसेवा

आपल्याला ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळेल का अशी चाचपणी घरगुती व्यायाम करणाऱ्यांकडून होत आहे. या सर्वांसाठी पोर्टल या स्टार्टअपचे ‘स्मार्ट मिरर’ महत्त्वाचे ठरत आहे.

पुणे - कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव झाल्यानंतर आरोग्याची काळजी (Health Care) ही आणखी अत्यावश्‍यक बनली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत ऑनलाइन व्यायाम (Online Excercise) शिकणे, व्हिडिओच्या माध्यमातून योगसाधना, झुंबा, (Jhumba) ऐरोबिक्स यांसारखे व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे व्यायाम करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या वस्तूंची मागणीदेखील या काळात वाढली आहे. मात्र असे असले तरी घरी व्यायाम करण्यात प्रशिक्षणाबाबत काही अडथळे निर्माण होत आहेत.

आपल्याला ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळेल का अशी चाचपणी घरगुती व्यायाम करणाऱ्यांकडून होत आहे. या सर्वांसाठी पोर्टल या स्टार्टअपचे ‘स्मार्ट मिरर’ महत्त्वाचे ठरत आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार घरच्या घरी व्यायाम करण्यास सोपे जावे, या हेतूने स्टार्टअपने ही मिरर तयार केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित असलेला हा आरसा व्यायाम प्रेमींना केव्हाही त्याच्या सोयीनुसार आणि घरातील कोणत्याही जागेत व्यायाम करण्यास मदत करतो. हा छोटा आरसा आहे जो वैयक्तिक व्यायाम म्हणजेच ग्राहकाला पर्सनल ट्रेनिंग पुरवते. या स्मार्ट मिररमध्ये ४३ इंचाची स्क्रीन आहे. इंद्रनील गुप्ता यांनी हैदराबादमध्ये या स्टार्टअपची स्थापना केली आहे. तर विशाल चंदपेटा हे स्टार्टअपचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत.

असे काम करते पोर्टल

गरजेनुसार आणि मूडनुसार विविध व्यायाम, योगा आणि ध्यान असे फिटनेसचे विविध प्रकार आणि न्यूट्रिशन कोचिंग या आरशात आहेत. त्यात असलेला व्यायामाचा प्रकार निवडल्यानंतर व्हिडिओ सुरू होतो व तो व्यायाम नेमका कसा करायचा हे सांगितले जाते. व्यायाम करीत असताना काही मार्गदर्शन लागले तर तेही आॅनलाइन पुरवले जाते. पोर्टलमध्ये स्मार्ट सेन्सर्स आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती या आरशासमोर व्यायाम करते तेव्हा तो रिअल टाइममध्ये काम करतो. न्यूट्रिशन कोचिंगच्या मागणीनुसार शेकडो वर्कआउट त्यात उपलब्ध आहेत. तसेच या उपकरणात बायो-सेन्सर्स आहेत. जे व्यायाम करणाऱ्याचा रक्तदाब, ग्लुकोज, ईसीजी अशा अनेक बाबी तपासू शकते.

बदलत असलेल्या तंत्रज्ञानामुळे फिटनेस फक्त जिमपुरता मर्यादित राहिलेला नाही. आवश्‍यक ती साधने आणि ट्रेनर असेल तर आपल्या घरीच व्यायाम करता येऊ शकतो. आरोग्यबाबत जागृत असलेल्या व्यक्ती जेवणापासून व्यायाम आणि व्यक्तीगत प्रशिक्षकाप्रर्यंत सर्वच फिटनेसविषयक गरजा घरच्या घरी भागवू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पोर्टलवर आम्ही व्यक्तीगत फिटनेस, वेलनेस आणि जीवनशैली अनुभव तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत.

- इंद्रनील गुप्ता, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, पोर्टल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : भाजप खासदार निशिकांत दुबेंना मनसे नेत्याची मानहानीची नोटीस

RBI Repo Rate: महागाई झाली कमी! आता तुमचा EMI कमी होणार का? RBI लवकरच घेणार मोठा निर्णय

Crime News: कसारा रेल्वेस्थानकात टीसीकडून ७ वर्षांच्या चिमकुलीचा आईसमोरच विनयभंग; महिलेने उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले अन्...

Panchang 15 July 2025: आजच्या दिवशी ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

Solapur News : गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा खा. मोहिते पाटलांकडून निषेध

SCROLL FOR NEXT