पुणे - लॉकडाउनमुळे आर्थिक फटका बसत असला तरी कौटुंबिक प्रेम आणि जिव्हाळा मात्र वाढत आहे. लॉकडाऊनचा एक सकारात्मक परिणाम स्वमग्न मुले आणि त्यांचे कुटुंबीय अनुभवत आहेत.
आपल्या विश्वात रमणाऱ्या या मुलांमध्ये सद्यस्थितीचा परिणाम कसा झाला आहे, या बद्दल पालकांनी आपले अनुभव सांगितले. या मुलांचा आपल्या परिवारासोबतचा संवाद वाढला आहे. मोबाईल व लॅपटॉपसारख्या उपकरणांचा वापर करायला शिकणे, घरातील छोट्या कामांमध्ये मदत करणे अश्या अनेक छोट्या मोठ्या सकारात्मक बदलाबाबत या मुलांचे पालक आनंद व्यक्त करत आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आम्ही दोघेही कामाच्या निमित्ताने बाहेर असतो. त्यामुळे आम्हाला अनुजला (नाव बदलले आहे) पुरेसा वेळ देता येत नाही. मात्र लॉकडाउनमुळे आम्ही त्याला पूर्ण वेळ देतोय. त्यामुळे त्यात चांगले बदल होत असल्याचे सांगत असताना अनुजची आई नीता यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. श्रेया या 14 वर्षाच्या मुलीची आई सुषमा म्हणाल्या, "घरात तिला कोंडल्यासारख होते आहे. यामुळे ती चिडचिड सुद्धा करते. पण सध्या आम्ही सगळेच तिच्याबरोबर वेळ घालवत आहोत व तिच्याशी भरपूर गप्पा मारत आहोत. यामुळे आमच्यातील संवाद आणखीन वाढले आहेत.''
स्वमग्नता असलेल्या मुलांना गरज असते ती समजून घेण्याची. जगभरात 68 मुलांमागे एक स्वमग्न असे याचे प्रमाण आहे. बहुतांश पालक आपल्या स्वमग्न असलेल्या मुलाला किंवा मुलीला ऑटिझम सेंटरला पाठवत असतात. अशा केंद्रांमध्ये मुलांना योग्य ती थेरपी दिली जाते, त्यांच्या जेवणाची व खाण्यापिण्याची वेळ पाळली जाते. सध्या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे ही मुले आपल्या पालकांबरोबर आहेत.
ही मुले सामान्य मुलांसारखी घरी मदत करत आहेत. इतकंच नाही तर त्यांच्यात संवादाचे प्रमाण पण वाढल्याचे पालक आम्हाला कळवत आहेत, असे प्रसन्न ऑटिझम केंद्राच्या कार्यकारी अध्यक्षा साधना गोडबोले यांनी सांगितले.
माझा मुलगा निनाद चार वर्षांचा आहे व त्याला आम्ही सांगितलेल्या गोष्टी समजत आहेत. तो आमच्या सगळ्या गोष्टी ऐकतोय. सध्या तो टीव्ही जास्त बघतो त्यामुळे कधी कधी चिडचिड करतो. आमच्या घरात पाच लोक आहेत व या काळात आम्ही त्याच्या सोबत पूर्ण वेळ घालवत आहोत आणि त्याला नवीन गोष्टी शिकवत आहोत.
- निनादची आई
लॉकडाउन संपल्यानंतर सगळेच आपापल्या कामात व्यस्त होतील. तर या मुलांना पुन्हा वेळ देने पालकानासाठी आव्हानात्मक ठरेल. त्यामुळे मुलांमधील झालेला हा बदल लॉकडाउन नंतर सुद्धा कायम राहील का यावर आणखीन लक्ष केंद्रित करायला पाहिजे.
- सुभाष केसकर, संचालक- प्रसन्न ऑटिझम सेंटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.