पुणे

आनंदाची अक्षरफुले

CD

आनंदाची अक्षरफुले
........................................
पालक अन् मुलांमधील संवाद
एकनाथ आव्हाड
......................................
मुलं ही खूप अनुकरणशील असतात. मोठ्यांच्या बऱ्याच गोष्टी कळत नकळत त्यांच्यावर प्रभाव पाडत असतात. जर मोठीच मंडळी छोट्या मोठ्या यशाने हुरळून जात असेल आणि अपयशाने होरपळून जात असेल, तर मुलंही यापेक्षा वेगळं वागणार नाहीत, हे लक्षात यायला हवं.
......................................

पालकांचा मुलांशी होणारा संवाद मुलांच्या जगण्याला, वागण्याला, त्यांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेला आकार देणारा असतो. एक प्रसंग येथे सांगावासा वाटतो, बागेत गप्पा मारत बसणाऱ्या दोन मैत्रिणींची मुलं झाडावर चढतात. मुलं झाडावर उंच पोहोचल्यावर अचानक जोराचं वादळ येतं. ते झाड वाऱ्यानं गदागदा हलू लागतं. पहिल्या मुलाची आई घाईने आपल्या मुलाला म्हणते, ‘‘अरे, पटकन उतर खाली. पडशील.’’ दुसऱ्या मुलाची आई आपल्या मुलाला म्हणते, ‘‘बाळा सांभाळ, घट्ट पकडून ठेव.’’ खरं तर दोन्ही मैत्रिणींना आपापल्या मुलांना पडण्यापासून वाचवायचं होतं. पण दोघींचं बोलणं वेगळं. परिणामी, पहिल्या स्त्रीचा मुलगा फांदीवरून घसरून खाली पडतो. पण दुसऱ्या स्त्रीच्या मुलाने आईने सांगितल्याप्रमाणे फांदीला घट्ट धरून ठेवलं. वादळ थांबलं तसा तो उतरून खाली आला. ‘थिंक पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह’ हा विचार मला महत्त्वाचा वाटतो. मुलंही मग आपल्यासारखाच विचार करतात.

उक्ती कृतीत मेळ हवा
भोवतालचा बोकाळलेला चंगळवाद मुलांमध्येही शिरायला वेळ लागत नाही. प्रसारमाध्यमांचा प्रभाव तर मोठ्या प्रमाणावर मुलांवर होतो. मुलांसाठी स्मार्टफोन, त्यात नेटपॅक या साऱ्यांमुळे जग खूप जवळ आल्यासारखे झाले आहे. फेसबुक,‌ व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम या साऱ्यांमुळे आजही मुलं अनेकांशी झटपट जोडली जात आहेत. त्यांच्यात मैत्री होत आहे. या आभासी दुनियेत वाहवत जाण्याची आजच्या स्मार्ट मुलांची शक्यताही अधिक आहे. वाईट सवयींना, व्यसनांना बळी पडणाऱ्या मुलांच्या बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचतच असतो. हे सारं कुठेतरी थांबायला हवं, असं आपल्याला मनापासून वाटतही असतं. याची सुरुवात आपल्या घरापासून करायला हवी. आपल्या धडपडीतून, परिश्रमातून पुढे आलेल्या मुलांचा आदर्श आजच्या लहानग्यांपुढे ठेवायला हवा‌. वाईट ऐकू नको, वाईट पाहू नको, वाईट बोलू नको हे सांगतानाच काय पाहायला, ऐकायला आणि बोलायला हवं हेसुद्धा आवर्जून सांगावं. त्यापेक्षा हे सांगणं तुमच्या कृतीतून परावर्तित होऊ द्या. आपलं बोलणं आणि आपली कृती यात मेळ बसला, की मुलांचा गोंधळ होत नाही‌. नाहीतर घरात बाबा असतात फोन आला, ‘‘बाबा आहेत का घरी?’’ असं फोनवर मुलाला विचारल्यावर बाबा हातानेच खूण करून घरी नाहीत म्हणून मुलाला सांगायला लावतात. आणि अभ्यासाच्या वेळी ते, ‘‘खोटं कधी बोलू नये.’’ यावर अभ्यास घेतात.

हल्लीच्या मुलांमध्ये महत्त्वाकांक्षा खूप असते, पण क्रियाशीलतेचा अभाव दिसून येतो. ही निष्क्रिय महत्त्वाकांक्षा अपयशाला कारणीभूत ठरते. आपण जे काम करतो ते छोटं की मोठं ते महत्त्वाचं नसतं. त्या कामाचं परिश्रमानं सोनं करणं हे महत्त्वाचं असतं. विद्वत्ता, कर्तृत्वासोबत ‘शील’ ही महत्त्वाचं आहे, याची जाणीव मुलांना पौगंडावस्थेत होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सामाजिक जाणीव आजच्या मुलांमध्ये रुजण्यासाठी जाणीवपूर्वक प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत, हेसुद्धा तितकंच खरं! आजचं मूल घडताना भोवताली सगळंच नकारात्मक, निराशाजनक चाललेलं आहे, असं नाही. पण जे जे चांगलं, उदात्त, मंगलमय चाललेलं आहे, ते ते दाखवणं, ते ते मुलांमध्ये मुरवणं, हे मोठ्यांचंच काम आहे. आजची मुलंही स्मार्टफोनसारखी ‘स्मार्ट’ आहेत. विविध कलागुणांमध्ये तरबेज निपुण आहेत. त्यांच्या गुणांना खतपाणी घालणं आणि त्यांच्यातील अवगुणांवर पांघरूण न घालता त्याची योग्य प्रकारे त्यांना जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे. तसंच आपल्या मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण देण्याचा आग्रह धरणं ही गोष्ट सुद्धा मुलांच्या घडण्यासाठी उपयोगी ठरणारी आहे.

‘आइस्क्रीम’ हा पदार्थ मुलांना खूप आवडत असतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी आइस्क्रीममधला आ-आत्मविश्वास, इ- इच्छाशक्ती, स- सकारात्मक दृष्टिकोन, क्री- क्रियाशीलता आणि म-महत्त्वाकांक्षा हे लक्षात ठेवायला आणि त्याप्रमाणे वागायला काय हरकत आहे. वृक्षांची मुळे खोलवर असतात. झाडाला ती क्षार, पाणी देतात. मुळांमुळे झाड ताठ उभे असते. आपल्या मुलांच्या आयुष्याचे असेच आहे. त्यांना मिळालेले विचार, संस्कार त्यांना आयुष्यात ताठ मानेने जगण्यास उपयोगी पडत असतात. शिक्षणातून आजचा मुलगा केवळ बुद्धिमान होण्यापेक्षा सुसंस्कारितही व्हायला हवा. शिक्षण म्हणजे केवळ वही, पेन नाही. तर शिक्षण म्हणजे बुद्धीला सत्याकडे, मनाला माणुसकीकडे आणि शरीराला खऱ्याखुऱ्या श्रमाकडे नेण्याचा मार्ग ठरावा. या साऱ्या गोष्टी जुळून आल्या की आजचे मूल त्याचे स्वतंत्र, वेगळे आणि संपन्न असे व्यक्तिमत्त्व घेऊन आपल्या समोर नक्की उभे असेल.
.........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT