CA 
पुणे

Positive Story: हेल्परचा मुलगा झाला CA; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाठलं यश

सकाळ वृत्तसेवा

सहकारनगर (पुणे) : दहा बाय दहा आकाराचं झोपडपट्टीत घर, घरची परिस्थिती हलाखीची, पण असं असतानाही परिस्थितीवर मात करून सिद्धार्थनगर येथील विकास अर्जुन लोखंडे याने चार्टर्ड अकाउटंट म्हणजे सीएची परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केलं आहे.

वडील अर्जुन लोखंडे हे ऑटो इलेक्ट्रॉनिक गॅरेजमध्ये हेल्पर म्हणून काम करतात, तर आई धुणी-भांडी आणि घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विकास लोखंडे याने अवघड समजल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत यश खेचून आणत वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्यामुळे विकासचे गावकऱ्यांकडून तसेच पुणे शहरातील मातंग समाजातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

यश मिळाल्याचा आनंद साजरा करत असताना विकास म्हणाला, झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिक्षण घेताना खूप अडचणी येतात, मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रामाणिकपणे मेहनत केल्यावर यश हमखास मिळते. मला गणिताची आवड होती. सातवीत असताना शालेय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्याने मी पुढे सीए होण्याचे ठरवले आणि वडिलांचीही इच्छा होती म्हणून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहावी पासून तयारी ठेवली. बारावीपासून सीएचा अभ्यास चालू ठेवला, अखेर बी.कॉमनंतर तिसऱ्या टप्प्यात सीएमध्ये यश मिळाले, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.

मुलाच्या यशाबद्दल अर्जुन लोखंडे म्हणाले, सिद्धार्थनगरच्या पद्मावती-दाते बस थांबा येथील झोपडपट्टीत आम्ही राहत आहोत. माझ्या मुलांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे, असे मला नेहमी वाटत होते. त्यामुळे मी लहानपणापासून मुलांच्या शिक्षणकडे लक्ष देत होतो. आता एक मुलगा सीए झाला, तर दुसरा मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Project : पोयनार, न्यू मांडवे धरणांना मान्यता; मंत्री कदम, पोयनारला २६५, न्यू मांडवेला १९५ कोटी

Nashik Municipal Corporation : नाशिकच्या २४ खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार! महापालिका अंदाजपत्रकात 'खेडे विकास निधी'ची तरतूद

'यापेक्षा पॉर्न बरं असतं' नोरा फतेहीच्या गाण्यावर भडकले नेटकरी, म्हणाले...'शब्द असे की...'

"काहीही झालं तरीही व्यायाम चुकवत नाही" कमळीच्या 68 वर्षांच्या आजीचं थक्क करणारं फिटनेस रुटीन

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT