सहा रुग्ण दगावले; आढळले ४०८ नवे रुग्ण 
पुणे

पुण्यात पॉझिटिव्हीटी रेट घटला; एका दिवसात ५७३ नवे रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

पुणे : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यातील रुग्णसंख्या आता आटोक्यात आली आहे. कमी होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे पुण्यातील वीकेंड लॉकडाऊन प्रशासनाने रद्द केला आहे. दरम्यान, गेल्या पाच आठवड्यात पॉझिटीव्हीटी रेट 19 टक्क्यांवरून 8 टक्के इतका खाली आला. 22 एप्रिल ते 28 एप्रिल या कालावधीत 28 हजार 13 रुग्ण सापडले होते. त्यानंतर 29 एप्रिल ते 5 मे या आठवड्यात 25 हजार रुग्ण आढळले होते. गेल्या आठवड्यात 10 हजार तर 20 मे ते 26 मे या कालावधीत 5 हजार 369 नवे रुग्ण सापडले. आठवड्याला एकूण होणाऱ्या चाचण्यांच्या तुलनेत नव्या रुग्णांमध्ये झालेली घट ही दिलासादायक अशी आहे.(Positivity rate declined in Pune 573 new patients in one day)

जिल्ह्यातील शुक्रवारची कोरोना रुग्ण आकडेवारी

- पुणे शहर --- ५७३
- पिंपरी चिंचवड --- ५२०
- जिल्हा परिषद कार्यक्षेत्र --- ११८२
- नगरपालिका क्षेत्र --- २३०
- कॅंटोन्मेंट बोर्ड --- १९
------------------------
- पुणे जिल्हा एकूण --- २५२४

- आजचे एकूण कोरोनामुक्त --- ३१६१
- आजचे मृत्यू --- ६०

पुण्यातील वीकेंड लॉकडाऊन रद्द

कोरोनाबाधितांची संख्या घटू लागल्याने महापालिकेने टप्प्याटप्प्याने अनलॉकच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. शनिवारपासून आता आठवड्याच्या सातही दिवस अत्यावश्‍यक आणि जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांसह काही ठराविक दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेस सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी असलेले वीकेंड लॉकडाउन रद्द करण्यात आला आहे.

आठवडाभर काय राहणार सुरु? (वेळी सकाळी ७ ते ११)

- किराणा, भाजीपाला, फळ विक्री दुकाने, डेअरी, मिठाई, चिकन, मटन, अंडी, मासे विक्री आणि सर्व प्रकाराची खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने

- कृषी संबधित बी, बियाणे, खते, उपकरणे, त्यांच्याशी निगडीत देखभाल दुरुस्ती सेवा ही दुकाने

- पाळीव प्राणी खाद्यांची दुकाने

- पावसाळा हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणारी दुकाने

- चष्म्याची दुकाने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT