पुणे

Loksabha 2019 : काँग्रेसच्या इच्छुकांना आज दिल्लीत पाचारण

सकाळवृत्तसेवा

पुणे -  पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील शहर काँग्रेसमधील इच्छुकांना आज  (शुक्रवारी) दिल्ली येथे बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींसमवेत होणाऱ्या बैठकीत काँग्रेसचा उमेदवार निश्‍चित होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पक्षाकडून उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

पुणे शहरात काँग्रेसमधील इच्छुकांबरोबरच खासदार संजय काकडे आणि प्रवीण गायकवाड इच्छुक होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून काकडे आणि गायकवाड ही नावे मागे पडली आहेत. त्यामुळे माजी आमदार मोहन जोशी आणि महापालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांची नावे आघाडीवर आहेत. या दोन्ही नावांवर प्रदेश काँग्रेसमधील नेत्यांचे एकमत झाले आहे. ही दोन्ही नावे प्रदेशकडून दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आली आहे, त्यावर आतापर्यंत दोन बैठका झाल्या. दरम्यान, उद्या पुन्हा दिल्लीत पक्षश्रेष्ठींसमोर बैठक होणार आहे. त्यामध्ये एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी इच्छुकांना दिल्लीला बोलविले आहे. उद्या सायंकाळी ही बैठक होणार आहे. त्यामुळे उमेदवारीची माळ जोशी की शिंदे यांच्या गळ्यात पडणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT