The possibility of increasing the sub-center of board examinations 
पुणे

'जिथे शाळा, तिथे केंद्र'; बोर्डाच्या परीक्षेची उपकेंद्र वाढण्याची शक्‍यता; नियोजन अद्याप गुलदस्त्यात 

मीनाक्षी गुरव

पुणे : राज्यातील जवळपास 30 लाखांहून अधिक विद्यार्थी दरवर्षी दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा देतात. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 2021मध्ये होणारी परीक्षा सोशल (फिजिकल) डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून घ्यावी लागणार आहेत. परिणामी परीक्षा केंद्र, उपकेंद्र यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता आहे. मात्र, याबाबतचा निर्णय आरोग्य विभागाच्या पुढील काळात येणाऱ्या सूचनांवर अवलंबून असेल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षेसाठी प्रत्येक वर्गात 25 विद्यार्थी याप्रमाणे परीक्षा केंद्र आणि उपकेंद्रांची निवड करण्यात येते. मात्र, यंदा 2021मध्ये होणाऱ्या बोर्डाची परीक्षा घेण्यासाठी राज्य मंडळाला तारेवरची कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत. कोरोनाच्या काळात नोव्हेंबर-डिसेंबर2020 मध्ये घेतलेल्या पुरवणी परीक्षेत एक बाकडा सोडून एक बाकडा अशी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. त्याप्रमाणे एका वर्गात साधारणत: 15 ते 20 विद्यार्थी बसविले होते. याच धर्तीवर आता 2021च्या परीक्षेसाठी देखील नियोजन करण्यात येण्याची शक्‍यता आहे. मात्र, 2021मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या या दोन्ही परीक्षांसाठी 30 लाखांहून अधिक विद्यार्थी नोंदणी करतात. त्यामुळे एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी याप्रमाणे नियोजन करण्यासाठी पावले उचलली जात असल्याने परीक्षेची उपक्रेंद वाढतील, असे पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष टी.एन.सुपे यांनी अधोरेखित केले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना आपापल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा देणे अधिक सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे "जिथे शाळा, तिथे केंद्र' याप्रमाणे परीक्षा उपकेंद्र असावीत, अशी मागणी जोर धरू लागण्याची शक्‍यताही मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार करणार परीक्षेचे नियोजन 
"राज्य मंडळामार्फत नोव्हेंबर-डिसेंबर2020मध्ये घेतलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेत एक बाकडा सोडून एका बाकड्यावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली होती. मात्र 2021मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी बराच कालावधी आहे. महिन्याभरात कोरोनाच्या संसर्गाचे चित्र आणखी स्पष्ट होईल. त्यानंतर राज्य आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शक सूचना देण्यात येतील. त्यानुसार राज्य मंडळ परीक्षेचे नियोजन करेल. त्यामुळे अद्याप परीक्षा केंद्र, उपक्रेंद वाढणार का नाही?, हे सांगणे अशक्‍य आहे.'' 
- डॉ. अशोक भोसले, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विदर्भ, मराठवाड्यातील उन्हाच्या झळांचाही नियोजन करताना बारावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर, तर दहावीच्या परीक्षा एक मेनंतर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. परंतु या परीक्षा ऐन उन्हाळ्यात येत असल्याने परीक्षेचे नियोजन करताना विदर्भ, मराठवाड्यातील कडक उन्हाळा लक्षात घेता पेपरच्या वेळा सकाळच्याच ठेवणे विद्यार्थ्यांसाठी सोयीचे होणार आहे. उन्हाच्या कडाक्‍याचा अंदाज घेऊन परीक्षेची वेळ याचे नियोजन करावे लागणार आहे. तसेच कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांना आपापल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा देण्याची सोय उपलब्ध व्हावी, अशी मागणी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शिक्षण विकास मंचाने केली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT