possibility of sanjay shindes entry in NCP
possibility of sanjay shindes entry in NCP 
पुणे

Loksabha 2019 : संजय शिंदेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश; माढ्यातून लोकसभेच्या उमेदवारीची चिन्हे

सकाळवृत्तसेवा

पुणे : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा आज बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याची चिन्हे आहेत. ते माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. पवार माढ्यातून शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करतील अशी चर्चा आहे. म्हणूनच माढातून भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील विरुद्ध संजय शिंदे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

शिंदे हे सध्या भाजपच्या पाठिंब्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. शिंदे व मोहिते या घराण्यात पारंपरिक राजकीय स्पर्धा गेल्या दहा वर्षापासून सुरु आहे. त्यामुळे मोहिते विरुद्ध शिंदे यांची लढत सर्वांचे लक्ष वेधणारी ठरु शकते. 

शरद पवार यांच्या निवासस्थानी होईल बैठक! -
रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपामध्ये गेल्याने राष्ट्रवादी माढ्यातून कोणाला उमेदवारी देणार, याची चर्चा होती. मात्र आज हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. शरद पवार आज संध्याकाळी बारामतीमधल्या निवासस्थानी बैठक घेणार आहेत. यामध्ये संजय शिंदे यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. संजय शिंदे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचे लहान भाऊ आहेत. संजय शिंदे मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जातात. त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीला रामराम करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात त्यांना थोड्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT