rupee bank sakal
पुणे

रुपी बँक अवसायनात काढण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती

रुपी को-ऑपरेटिव्ह बँक अवसायनात काढण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला उच्च न्यायालयाकडून पुढील चार आठवडे म्हणजे येत्या १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

रुपी को-ऑपरेटिव्ह बँक अवसायनात काढण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला उच्च न्यायालयाकडून पुढील चार आठवडे म्हणजे येत्या १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

पुणे - रुपी को-ऑपरेटिव्ह बँक अवसायनात काढण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला उच्च न्यायालयाकडून पुढील चार आठवडे म्हणजे येत्या १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. रुपी बॅंकेला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, बॅंकेसाठी हा निर्णय दिलासादायक मानला जात आहे.

रुपी बँकेवर रिझर्व्ह बँकेची सर्वंकष बंधने आहेत. रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेचा परवाना रद्द करीत २२ सप्टेंबरपासून बॅंक अवसायनामध्ये (लिक्विडेशन) काढण्याचा आदेश ८ ऑगस्ट रोजी दिला होता. त्यामुळे गुरुवारपासून बॅंक अवसायनात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु उच्च न्यायालय आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयात दाखल याचिकांवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे याबाबत नेमके काय होणार, याकडे ठेवीदार-खातेदारांचे लक्ष लागले आहे.

बॅंकेचा परवाना रद्द करण्याच्या आदेशाविरुध्द रुपी बँकेने केंद्रीय अर्थ मंत्रालयातील सहसचिव यांच्यापुढे अपील दाखल केले आहे. त्यावर १९ सप्टेंबर रोजी अंतरिम स्थगितीबाबत सुनावणी झाली. अपीलीय अधिकारी यांनी अंतरिम स्थगिती देण्याची रुपी बँकेची विनंती नाकारली. मात्र, पुढील सुनावणीसाठी १७ ऑक्टोबर ही तारीख दिली आहे.

दुसरीकडे, बँक अवसायनात आणण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशाविरुध्द उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. तसेच, बँकेने अंतरिम स्थगिती मिळण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली होती. यावर काल सुनावणी झाल्यानंतर आज २२ सप्टेंबर रोजी न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यानुसार रुपी बँक अवसायनात काढण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशास १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बँकेला आणि प्रशासकांना त्यांचे प्रयत्न जोमाने चालू ठेवण्यासाठी नक्कीच काही अवधी मिळालेला आहे. याचा फायदा बँकेचा प्रश्न चांगल्या प्रकारे सोडविण्यासाठी होईल. ही एक हुरुप देणारी घटना असून, सहकारी बँकांच्या व सहकार क्षेत्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण बाब आहे.

- सुधीर पंडित, प्रशासक रुपी बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran India Oil Supply : इराणकडून भारतात येणारा ‘होर्मुझ’ सामुद्रमार्ग बंद, फक्त ४५ दिवसांचा इंधनसाठा; केपलर संस्थेची माहिती

सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर शाळा, पालकांची जबाबदारी

आजचे राशिभविष्य - 04 मार्च 2026

मोठी बातमी! ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार; जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार; ‘या’ १६ सुविधा गावातच मिळणार

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

SCROLL FOR NEXT