pune-krushi-bazar-samiti 
पुणे

बी.जे देशमुख यांच्या निर्णयांना स्थगिती 

सकाळवृत्तसेवा

पुणे - बाजार समितीचे सेवानिवृत्त प्रशासक बी. जे. देशमुख यांनी गेल्या तीन महिन्यात घेतलेले सर्व निर्णय थांबविण्याचे आदेश प्रशासक मधुकांत गरड यांनी दिले आहेत. त्यामुळे देशमुख यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. 

बाजार समितीचे मुख्य प्रशासक म्हणून गेल्या वर्षी सेवानिवृत्त झाले. त्यांना सरकारकडून एक वर्षांची मुदत वाढ देण्यात आली होती. ही मुदत 31 ऑगस्ट रोजी संपुष्टात आली. त्यांना राज्य सरकारकडून पुन्हा मुदत वाढ देण्यात आली नाही. दरम्यान देशमुख यांनी मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केले आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयांची आणि त्यांच्या कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी माजी आमदार जगनाथ शेवाळे, समितीचे माजी संचालक प्रकाश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे प्रदेशचे उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. तसेच त्यांची पदावरून तातडीने हकालपट्टी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या मागणीसाठी त्यांनी सहकार मंत्री आणि पालकमंत्री यांची देखील भेट घेतली होती. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी चौकशी करण्याचे आदेश पणन संचालकांना दिले होते. त्यानुसार पणन संचालकांनी देखील त्यांची चौकशी सुरू केली होती. दरम्यान देशमुख यांच्या जागी राज्य सरकारकडून दोन दिवसांपूर्वी मधुकांत गरड यांनी नियुक्ती करण्यात आली. गरड यांनी पदभार घेतल्यानंतर देशमुख यांनी गेल्या तीन महिन्यात घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशमुख यांच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात त्यांनी घेतलेल्या निर्णय थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्या निर्णयावर कार्यवाही करण्यापूर्वी त्यांची टिपणी सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
मधुकांत गरड (प्रशासक, बाजार समिती) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT