surgery 
पुणे

#WeCareForPune पुण्यात शस्त्रक्रिया लांबणीवर; धोका नको म्हणून निर्णय

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी रुग्णालयांमधील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. फक्त ‘इमर्जन्सी’ शस्त्रक्रिया सुरू असून, बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.

शहर व परिसरात कोरोनाचे रुग्ण आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे परदेशांत प्रवास करून आले आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना याचा संसर्ग होण्याचा धोका आहे. विषाणूंचा उद्रेक टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. 

या अंतर्गत जिल्हा प्रशासनाने शहरातील रुग्णालयांना नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा किंवा त्यांची संख्या कमी करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार काही रुग्णालयांनी कार्यवाही केली आहे. यातून इमर्जन्सी शस्त्रक्रिया वगळल्या आहेत. 
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयात गर्दी होते. तसेच, भविष्यात आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास तज्ज्ञ डॉक्‍टरांची गरज भासणार आहे. हे विशेषज्ज्ञ उपलब्ध पाहिजेत, हा यामागचा एक विचार आहे.   रक्तपेढ्यांमध्येही ‘इमर्जन्सी’साठी रक्तसाठा असणे आवश्‍यक आहे. 

नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलणे शक्‍य असेल तर ते करावे, असे आवाहन रुग्णालयांना करण्यात आले आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय डॉक्‍टरांनीच घ्यावा. शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद करण्याचा आदेश नाही. त्यामुळे अत्यावश्‍यक शस्त्रक्रिया सुरू राहणार आहेत. 
- डॉ. दीपक म्हैसेकर,  विभागीय आयुक्त, पुणे 

का घेतला निर्णय?
कोरोनाचा पहिला उद्रेक झालेल्या चीनमधील वुहान शहरात सुरुवातीला शस्त्रक्रिया सुरूच ठेवल्या होत्या. त्यातून विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी पुण्याने हे पाऊल उचलले आहे. त्याला वैद्यकीय तज्ज्ञ, शल्यचिकीत्सक आणि रुग्णालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.  

रुग्णालयांनी हे करावे
    परदेशातून आलेल्यांची माहिती रुग्णाच्या नातेवाइकांकडून घ्यावी
    रुग्ण व नातेवाइकांपासून डॉक्‍टर, नर्स, कर्मचाऱ्यांनी अंतरावर राहावे
    हात वारंवार स्वच्छ धुवावेत
     गर्भवती, ज्येष्ठ नागरिक, मधुमेही रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा

दवाखान्यांमध्ये हे करावे
    गेल्या २८ दिवसांत परदेशी प्रवास केला का, हे विचारा
    सर्दी, ताप, खोकला याबाबतची चौकशी करा
    दवाखान्यात रुग्णांची गर्दी होऊ देऊ नका
    डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

SCROLL FOR NEXT