poultry-business 
पुणे

कोरोनाच्या अफवेमुळे कोंबड्यांच्या भावात घट; पोल्ट्री व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात

सकाळवृत्तसेवा

सातगाव पठार - चीनमधील कोरोना व्हायरसची लागण भारतात कोंबड्यांना झाल्याच्या निव्वळ अफवेमुळे कोंबड्यांचे भाव कोसळले आहेत. या कोंबड्यांचा बाजारभाव 80 रुपयांवरून 27 रुपये प्रतिकिलोवर आला आहे. यामुळे पोल्ट्री व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. 

सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात पोल्ट्रीधारक कंपन्यांशी करार करून कोंबडी पालन करतात. तसेच, खुल्या पद्धतीने कोंबड्या पाळणारे छोटे व्यावसायिक या प्रकारामुळे अडचणीत आले आहेत. सरासरी 45 दिवसांत कोंबड्या विक्रीसाठी तयार होते. पण, बाजारभाव 80 रुपयांवरून अवघ्या 27 रुपयांपर्यंत खाली आल्याने कंपन्यांचा उत्पादनखर्चही निघत नसल्याने 50-52 दिवस कोंबड्या जगवूनही विक्री होत नसल्याने कंपन्याही मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. 

उन्हाळ्यात कोंबड्यांचे भाव वाढतील, या अपेक्षेने शेतकरी व कंपन्यांनी लाखो रुपये भांडवल गुंतवले होते. पण बाजारभाव गडगडल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. अशी माहिती पोल्ट्री व्यावसायिक सुनील धुमाळ यांनी दिली. 

लोकांनी कोरोनाच्या अफवेवर विश्वास न ठेवता चिकन अंडी खाल्ली आणि कंपन्यांनी समाजात प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती केली तरच पोल्ट्री व्यवसाय सावरण्यास हातभार लागेल, असे पोल्ट्री व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT