Pune Crime esakal
पुणे

Pune Crime : पेट्रोल ओतणाऱ्याला कोठडी; महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न

मद्यपी वाहनचालकांवर कारवाई सुरू असताना मद्यपी दुचाकीस्वाराने महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर बाटलीतील पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून मद्यपीला पकडल्याने अनर्थ टळला.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : मद्यपी वाहनचालकांवर कारवाई सुरू असताना मद्यपी दुचाकीस्वाराने महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर बाटलीतील पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून मद्यपीला पकडल्याने अनर्थ टळला. खुनाचा प्रयत्न केल्याने त्याला अटक केली आहे.

या घटनेत सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर आणि हवालदार समीर सावंत यांना किरकोळ दुखापत झाली आहे. खुनाचा प्रयत्न करणे, तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संजय फकिरबा साळवे (वय ३२, सध्या रा. पिंपरी-चिंचवड, मूळ रा. पिंपळगाव शेला, जवखेडा बुद्रूक, जि. जालना) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हवालदार सावंत यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर मद्यपी वाहनचालकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागांत नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येत होती. दुचाकीस्वार साळवे याची तपासणी करण्यात आली. त्याने मद्यप्राशन केल्याचे आढळून आले.

त्यामुळे त्याच्यावर कारवाई सुरू करण्यात आली. त्याला फरासखाना वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेले. तेथे त्याने पोलिसांच्या हातातील ई-चलन यंत्र हिसकावून घेतले. या घटनेनंतर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक जानकर तेथे आल्या. साळवेने बाटलीतील पेट्रोल जानकर आणि सावंत यांच्या अंगावर ओतले. त्याच्याकडील लायटरने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अनर्थ टळला. साळवेवर गुन्हा दाखल करून त्याला रात्री अटक करण्यात आली.

एक दिवसाची पोलिस कोठडी

साळवे याला शनिवारी न्यायालयात हजर केले होते. गुन्ह्याच्या पुढील चौकशीसाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार साळवेला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

FIFA World Cup 2026: अमेरिकेची विश्वकरंडकात धडाकेबाज एंट्री! ऑस्ट्रेलियाचा पराभव करून थेट बाद फेरीत

Yoga Day Wishes in Marathi: योग म्हणजे स्वतःशी जोडणारा सर्वात सुंदर संवाद! योग दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा आणि प्रेरणादायी संदेश!

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या युवासेनेकडून ओमराजे यांना संरक्षण, मध्यरात्री कार्यकर्ते थेट ओमराजे यांच्या घराबाहेर

SCROLL FOR NEXT