पुणे

लोणी काळभोरमध्ये विजेचा लपंडाव

CD

लोणी काळभोर, ता. १० : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर उपविभागात गेल्या आठ दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिक हैराण झाले आहेत. सततच्या व्यत्ययामुळे उपकरणांचे नुकसान होत असून महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दुरुस्तीच्या नावाखाली वीज बंद राहत असल्याने घरगुती व व्यावसायिक कामांचा खोळंबा होत आहे. पावसाअभावी शेतीला पाणी देण्यासाठी कृषिपंपांचा वापर वाढला असतानाच वीज नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. स्मार्ट मीटरची वाढीव बिले आणि तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत. थकीत बिलांसाठी तत्परतेने वीज कापणाऱ्या महावितरणने वीजचोरीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातील या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

‘‘३० ते ४० वर्षांपूर्वीचे जुने कंडक्टर बदलणे आवश्यक असल्याने गुरुवारी वीजपुरवठा बंद ठेवून काम केले जात आहे. व्होल्टेज सुधारण्यासाठी कपॅसिटर बँक बसविण्याचे काम सुरू असून याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. सध्या कृषिपंपांमुळे भार वाढल्याने फुरसुंगी ते तरडे वाहिनीवर तांत्रिक बिघाड होत आहेत. विकासकामांसाठीही काही काळ वीज बंद ठेवावी लागते.’’
-विक्रांत मोहोळ, सहाय्यक अभियंता, महावितरण, लोणी काळभोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आचारसंहितेत अडकला दिवाळीचा बोनस; निवडणूक आयोगाच्या परवानगीसाठी प्रयत्न

तरुणांनो, मला तुमचा अभिमान! दिल्लीतील आंदोलनावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; मोदी सरकारला दिला थेट इशारा, काय म्हणाले?

Marathi News Live Updates : तुषार गांधी यांना अटक, आदित्य ठाकरे, संजय राऊत DN नगर पोलीस ठाण्यात

Delhi Protest High Drama : निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; दिल्लीत भाजपच्या आमदाराच्या लेकीला पोलिसांकडून ताब्यात! फोटो समोर

Shubham Shelke Court Verdict : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळकेंना न्यायालयाकडून मोठा दिलासा; 5 लाखांच्या बाँडसह जामिनाचा पोलिसांचा आदेश रद्द

SCROLL FOR NEXT