पुणे

शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध नाही; पूर्वीच्या आरेखणानुसार महामार्ग तयार करावा

CD

शक्तीपीठ महामार्गाला
विरोध नाही ः देशमुख

पंढरपूर, ता. ३० ः नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला पंढरपूर, मोहोळ व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध नाही. पूर्वीच्या आरेखनानुसार महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करावे, सरकारला सहकार्य करण्यास या भागातील शेतकरी तयार आहेत, असे पंढरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख यांनी दिला आहे. या संदर्भात लवकरच आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शक्तीपीठ महामार्गाचे पूर्वीचे आरेखन बदलण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर मोहोळ, पंढरपूर, सांगोला या भागातील शेतकऱ्यांनी महामार्गासाठी जमिनी देण्याची तयारी दर्शवली आहे.
दोन दिवसापूर्वी पंढरपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयावर हलगीनाद मोर्चा काढून निवेदन ही देण्यात आले आहे. त्यानंतर सोमवारी (ता.१९) कासेगाव येथे या भागातील शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये शक्तिपीठ महामार्ग पूर्वीच्या आरेखनानुसार तयार करावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी विजयसिंह देशमुख म्हणाले की, पंढरपूर, सांगोला भागात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन होते. त्या दृष्टीने शक्तीपीठ महामार्ग या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

NZ beat SA in SF : दक्षिण आफ्रिका 'Chokers'! न्यूझीलंडचा T20 World Cup फायनलमध्ये प्रवेश, फिन'टॅस्टीक' शतक

Pune Latest News: पुण्यात अनधिकृत इमारतींवर हातोडा; वाघोलीत चार ते पाच मजल्यांच्या इमारती जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT