पुणे

इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बिघाड

CD

इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बिघाड
सिद्धटेक, ता.१०: अनेक दिवसांपासून गावातील काही भागात कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे विविध विद्युत उपकरणे सुरळीतपणे चालू शकत नाहीत. त्यातच दोन दिवसांपूर्वी क्षमतेपेक्षा जास्त दाबाने वीज पुरवठा होऊन याच भागातील अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे नादुरुस्त झाल्याने वीज ग्राहकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांशी वारंवार संपर्क करूनही हा बिघाड दुरुस्त करण्यात आला नसल्याचे ग्राहक सांगत आहेत. विजेतील कमी-अधिकपणाचे व्यवस्थापन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांना व्होल्टेज स्टॅबिलायझर बसवला जातो. परंतु अनेक ग्राहकांकडे तो नसल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात फ्रिज, वॉशिंग मशिन, पंखे, सेटटॉप बॉक्स, इन्व्हर्टर आदी उपकरणांचा समावेश आहे. वीजबिल वेळेत न भरल्यास कारवाईसाठी तत्परता दाखवणारे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी अशा घटनांकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान, एक ते दोन दिवसांत संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत करणार असल्याची माहिती महावितरणचे उप अभियंता अमोल कळंबे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT