पुणे

कऱ्हाड क्रीडापानमेनसाठीबातमी

CD

प्राची देवकरचा तांबवेकरांकडून सन्मान

आशियाई स्पर्धेत पटकावले कांस्यपदक; मिरवणूक काढून सत्कार

तांबवे, ता. १६ ः चीन येथे झालेल्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनमध्ये किरपे (ता. कऱ्हाड) येथील प्राची अंकुश देवकर हिने तीन हजार मीटर ट्रिपल चेसमध्ये १० मिनिटे ३२ सेकंद या वेळेत स्पर्धा जिंकून कांस्यपदक पटकावले. तिच्या कामगिरीबद्दल तांबवे ग्रामस्थ, आण्णा बाळा पाटील विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, दक्षिण तांबवे शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज तिची गावातून फुलांच्या उधळणीत मिरवणूक काढून सत्कारही करण्यात आला.
गावच्या कमानीपासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. वाद्यांच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत प्राचीवर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी केली. गांधी चौक, बाजारपेठ, शाळेच्या परिसरात महिलांनी, शिक्षिकांनी तिचे औक्षण करून तिचे अभिनंदन केले. त्यानंतर येथील आण्णा बाळा पाटील विद्यालयात तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी निवासराव पाटील, प्रदीप पाटील, दिलीप पाटील, मुख्याध्यापक विश्वास पाटील, राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल पाटील, तात्यासाहेब पाटील, सुरेश देसाई, डॉ. विकास पाटील, सुरेश पाटील, दादा शिंदे, अंकुश देवकर, विलास पाटील, दक्षिण तांबवे शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब साठे, तांबवे जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख आनंदा धायगुडे, शिक्षक हणमंत काटकर, अंकुश नांगरे, श्रीकांत बाबर, गुणवंत पाटील, खेळाडू निकिता पवार, कृषिसखी महिला मंडळातील सदस्या उपस्थित होत्या.
यावेळी निवासराव पाटील, प्रशिक्षक अतुल पाटील, प्राची देवकर, मुख्याध्यापक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेश आडके यांनी सूत्रसंचालन केले. श्री. काटकर यांनी आभार मानले.
...................

ऑलिंपिकमध्ये पदक मिळवावे

प्राची देवकर हिने अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. ग्रामीण भागातून तिचा सुरू झालेला प्रवास परदेशापर्यंत पोहोचला आहे. तिच्या यशाने देशाला कांस्यपदक मिळाले आहे. त्यामुळे देशाचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे आणि गावाचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. प्राचीने ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदक पटकावून देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.

--------------------------

34909
तांबवे ः प्राची देवकर हिचा सत्कार करताना निवासराव पाटील, प्रदीप पाटील, दिलीप पाटील, विश्वास पाटील, अतुल पाटील, तात्यासाहेब पाटील, सुरेश देसाई, डॉ. विकास पाटील, सुरेश पाटील, दादा शिंदे यांच्यासह शिक्षक. (अनिल बाबर ः सकाळ छायाचित्रसेवा)

--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT