भवानीनगर (ता. इंदापूर) ः छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रदीप निंबाळकर यांचा सत्कार करताना (उजवीकडून चौथे) राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व (उजवीकडून दुसरे) उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील. 
पुणे

'छत्रपती'च्या अध्यक्षपदी प्रदीप निंबाळकर (व्हिडिओ)

ज्ञानेश्वर रायते

भवानीनगर (पुणे): छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रदीप केशवराव निंबाळकर यांची बुधवारी (ता. 31) बिनविरोध निवड झाली.

छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदाचा अमरसिंह घोलप यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता कारखान्याच्या संचालक मंडळ सभागृहात सहायक निबंधक एस. एस. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा झाली. या सभेपूर्वी राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर हे पक्षश्रेष्ठींचा निरोप घेऊन आले होते. त्यांच्यासमवेत पंचायत समिती सदस्य भारत गावडे, विजय शिंदे, जितेंद्र काटे आदींनी संचालक मंडळाची भेट घेतली व संचालकांना अध्यक्षपदासाठी प्रदीप निंबाळकर यांच्या नावाची शिफारस माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली असल्याची माहिती दिली. त्यानंतर कारखान्याचे संचालक ऍड. लक्ष्मण शिंगाडे यांनी सूचक म्हणून अध्यक्षपदासाठी निंबाळकर यांचे नाव सुचवले. त्यास संतोष ढवाण यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्याने निंबाळकर यांची निवड बिनविरोध झाल्याचे कुंभार यांनी जाहीर केले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रेय भरणे यांच्याविषयी ऋण व्यक्त करतो. मात्र निवड झाली असली तरी काळ कसोटीचा आहे. यातून उभारी घेण्याचे आव्हान निश्‍चितच आहे. मात्र, यातच कौशल्य पणाला लावून काम करू. सर्व संचालक मंडळाला सोबत घेऊन काम करू. यापुढील काळात कारखान्यास आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.
- प्रदीप निंबाळकर, नवनिर्वाचित अध्यक्ष, छत्रपती कारखाना

उपाध्यक्षांना राजीनामा देण्याची सूचना
छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांना पदाचा राजीनामा देण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी केल्याचा निरोप संभाजी होळकर यांनी दिला. यापूर्वी अध्यक्षपदी घोलप व उपाध्यक्षपदी पाटील यांची निवड होताना एक ते सव्वा वर्ष असा कालावधी त्यावेळी जाहीर केला होता. मात्र, त्याहून अधिक काळ घोलप व पाटील पदावर राहिले. पाटील यांना पदाचा राजीनामा देण्याची सूचना झाल्याने नवे उपाध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली. मात्र हे पद इंदापूर तालुक्‍यातच राहणार असल्याचे निश्‍चित झाल्यानंतर अमोल पाटील, ऍड. लक्ष्मण शिंगाडे, गोपीचंद शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Politics: राज्यसभा निवडणूक बिनविरोध शक्य, आजोबा - नातू एकाचवेळी राज्यसभेत; एकनाथ शिंदेंनी आपल्याच नेत्यांचा केला गेम

'लोकांनी ऐकण्याची क्षमता गमावलीय' नोरा फतेही नेटकऱ्यांवर संतापली, म्हणाली...'समर्थन करणं हे...'

Latest Marathi News Live Update : राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात; कोणत्या घोषणा होणार?

Kannad Accident : कन्नड-वैजापूर मार्गावर अपघात; जेहूरचा तरुण जागीच ठार

Whale Vomit Smuggling Case : पाच किलो वजन आणि किंमत कोटींच्या घरात! महाबळेश्वरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; पुणे, मुंबईसह मालवणचे सात जण ताब्यात

SCROLL FOR NEXT