Home 
पुणे

अर्ध्या किमतीत घरे

अविनाश चिलेकर

पिंपरी - बाजारभावापेक्षा जवळपास अर्ध्या दरात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची चार हजार ८८३ घरे येत्या दोन वर्षांत उपलब्ध होणार आहेत. सुमारे ४५७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या कामाचे आदेश नुकतेच देण्यात आले असून, प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. गेल्या वीस वर्षांतील प्राधिकरणाची ही पहिलीच मोठी योजना आहे.

प्राधिकरणाच्या मोशी पेठ क्रमांक १२ मध्ये सुमारे ८० हेक्‍टर जागा आहे. त्यापैकी ९.३४ हेक्‍टर जागेवर नवीन घरांचा प्रकल्प होतो आहे. पर्यावरण विभाग आणि राज्य सरकारची त्याला रीतसर संमती मिळाली आहे. आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न घटक (एलआयजी) यांच्यासाठी हे प्रकल्प असल्याने त्यासाठी अडीच चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मंजूर आहे. अत्यंत सुसज्ज आणि सर्व सुविधायुक्त असा हा गृहप्रकल्प असेल. त्याची निविदा फेब्रुवारी २०१८ मध्ये काढण्यात आली. त्याच्या पंधरा दिवसांपूर्वी प्रत्यक्ष कामाचे आदेश देण्यात आले. पहिल्या टप्प्यातील काम यशनंद इंजिनिअर ॲण्ड कॉन्ट्रॅक्‍टर आणि दुसऱ्या टप्प्यातील काम शांती कन्स्ट्रक्‍शन जेव्ही यशनंद इंजिनिअर ॲण्ड कॉन्ट्रॅक्‍टर यांना देण्यात आले. कामाची मुदत चोवीस महिने आहे.

प्रकल्पातील सर्व इमारती या ११ मजली असतील. तळमजल्यावर पार्किंग आणि दुकाने असतील. त्याशिवाय मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते, पदपथ, क्‍लब हाउस, उद्यान आदी सुविधा असतील. संपूर्ण सोसायटीत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असेल. 

एकूण सहा हजार घरांचे काम
पेठ क्रमांक १२ मधील पाच हजार घरांशिवाय पेठ क्रमांक ६ मध्ये ३८४ सदनिकांचा नियोजित प्रकल्प आहे. वाल्हेकरवाडी येथे सुमारे ९०० घरांचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. पेठ क्रमांक १२ मधील उर्वरित ७० हेक्‍टर जागेवरही परवडणाऱ्या घरांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. 

सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाचा हा प्रकल्प आहे. काम अत्यंत दर्जेदार असेल. दोन वर्षांत ही घरे विक्रीसाठी उपलब्ध होतील.
- प्रमोद यादव, प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabaleshwar Rain Record : महाबळेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार, 24 तासांत 513 मिमी पाऊस; मोडला तब्बल 123 वर्षांपूर्वीचा विक्रम, प्रशासनाकडून हायअलर्ट जारी

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 44 बंधारे पाण्याखाली, 3 मुख्य राज्य महामार्ग बंद; 'पंचगंगा' इशारा पातळीच्या अगदी जवळ, गगनबावड्यात 101 मिमी पाऊस

Latest Marathi News Update: खडकवासला धरणात येणाऱ्या ओढ्याला पूर, पाबे घाटरस्त्यासह महत्त्वाचे मार्ग बंद

Pune Rain: आळंदीतील पूरस्थितीमुळे वारकऱ्यांसाठी पुण्यात मोठी व्यवस्था! पुढील पाच दिवस पाणी कपात देखील रद्द, महापालिकेचा मोठा निर्णय!

Koyna Dam Update : अवघ्या काही तासांत कोयना धरणाचा पाणीसाठा 30 TMC पार; पुढील 24 तास 'हायअलर्ट', गावांना दरडीचा धोका, धरण प्रशासनाचा मोठा इशारा

SCROLL FOR NEXT