आकुर्डी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची इमारत. 
पुणे

प्राधिकरणाच्या प्रकल्पांची वाट सुकर

दीपेश सुराणा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या प्रमुख प्रकल्पांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पांचे काम विना अडथळा मार्गी लागू शकणार आहे. पेठ क्रमांक सहामधील गृहयोजना अन्यत्र हलविण्याची नागरिकांची मागणी असल्याने सध्या संबंधित योजनेचे काम थंडावले आहे.

पेठ क्रमांक १२ येथील गृहप्रकल्प आणि मोशीतील पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रात उभारलेल्या खुल्या प्रदर्शन केंद्रासाठी २१ फेब्रुवारीला कार्यादेश दिलेले आहेत. तेव्हापासून संबंधित प्रकल्पांच्या कामाला सुरवात झाली आहे. पेठ क्रमांक तीन व चार येथील उद्यानांचे कामदेखील आठ जानेवारीला सुरू झाले. त्यामुळे या कामालाही आचारसंहितेचा फटका बसणार नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. 

पेठ क्रमांक सहामध्ये उभारण्यात येणाऱ्या ३८४ सदनिकांच्या प्रकल्पासाठी कामाचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे त्यालादेखील आचारसंहितेचा अडथळा जाणवणार नाही. मात्र, येथील स्थानिक रहिवाशांनी हा प्रकल्प अन्यत्र हलविण्याची मागणी केल्याने सध्या तो बंद स्थितीत आहे. साई चौक (जगताप डेअरी) येथील दोन समांतर उड्डाण पुलांपैकी किवळे-सांगवी फाटा मार्गावरील उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. सांगवी फाटा-किवळे मार्गावरील दुसऱ्या समांतर उड्डाण पुलाच्या कामात ३२ के.व्ही. उच्च दाब वीजवाहिनीचा अडथळा आहे. त्यामुळे या पुलाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. दोन्ही पुलांसाठी एकूण २७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संबंधित उच्च दाब वीज वाहिनीचे स्थलांतर एप्रिलअखेर पूर्ण होईल. तर, पुलाचे काम ऑक्‍टोबरअखेर मार्गी लागू शकणार आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र -
  क्षेत्र : २० हेक्‍टर   खर्च : ४४.२२ कोटी   मुदत : मे-२०२० पर्यंत   होणाऱ्या सुविधा : सपाटीकरण, अंतर्गत रस्ते, पार्किंग, आयकॉनिक प्रवेशद्वार, स्वच्छतागृह, लॅण्डस्केपिंग. 
  पेठ क्रमांक १२ गृहप्रकल्प : ४८८३ सदनिका व १४० दुकाने   दोन टप्प्यात प्रकल्प उभारणीचे नियोजन.   ढोबळ खर्च - ६३१.९७ कोटी 
   मुदत : २ वर्ष 
  पेठ क्रमांक सहामधील गृहयोजना : एकूण ३८४ सदनिका व १६ रो-हाउस   एकूण खर्च : ६० कोटी ५ लाख   सदनिकांसाठी कामाचे आदेश, रो-हाउसची निविदा प्रक्रिया सुरू   स्थानिक नागरिकांची प्रकल्प अन्यत्र हलविण्याची मागणी असल्याने सध्या प्रकल्प बंद स्थितीत.  
  उद्यानांचे काम : पेठ क्रमांक ३ व ४ मधील दोन उद्याने : अपेक्षित खर्च ः ४. ९० कोटी : जानेवारी महिन्यातच कामासाठी आदेश. 

प्राधिकरणाच्या प्रमुख प्रकल्पांसाठी लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी कामाचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचे काम करण्यात अडथळा नाही.
- अनिल सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता, प्राधिकरण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT