आकुर्डी - प्राधिकरणाचा सौरऊर्जा प्रकल्प. 
पुणे

सौरऊर्जा प्रकल्प चार महिन्यांपासून बंद

दीपेश सुराणा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा सौरऊर्जा प्रकल्प गेल्या चार महिन्यांपासून इन्व्हर्टर नादुरुस्त झाल्याने बंद पडला आहे. त्यामुळे प्राधिकरणाला दरमहा लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. 

प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील पर्यावरणपूरक इमारतीत २०१२ मध्ये सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात आला. प्राधिकरण कार्यालयाकडून फेब्रुवारी २०१३ पासून त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला. संबंधित प्रकल्पाच्या माध्यमातून दर तासाला सरासरी १०० किलोवॉट एवढी वीजनिर्मिती होते. हा प्रकल्प उभारण्यासाठी १ कोटी ८७ लाख इतका खर्च झाला आहे. प्रकल्पासाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेढा) यांच्याकडून सबसिडी मिळालेली असून, प्राधिकरण कार्यालयातील वीजपुरवठा, एसी आणि लिफ्टदेखील सौरऊर्जेवर चालते. 

सौरऊर्जेमार्फत निर्माण होणारी वीज महावितरणच्या मुख्य प्रवाहाला जोडलेली आहे. प्राधिकरण महावितरणची जेवढी वीज वापरते त्यातील सौरऊर्जेतून निर्माण झालेल्या विजेची रक्कम वजा करून उर्वरित वीजबिल प्राधिकरणाला भरावे लागते. सौरऊर्जेमुळे प्राधिकरणाला वीजबिलासाठी दरमहा फक्त १५ हजार इतका खर्च येत होता. मात्र, नोव्हेंबर २०१८ ला सौरऊर्जा प्रकल्पाचा इन्व्हर्टर नादुरुस्त झाला. तेव्हापासून प्राधिकरणाला दरमहा दीड लाख इतके वीजबिल भरावे लागत आहे. इन्व्हर्टरसाठी नव्याने निविदा प्रक्रिया सुरू असली तरी सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे त्याबाबतचे कार्यादेश देण्यात अडचण येणार पर्यायाने, हा प्रकल्प पुन्हा सुरू होण्यास विलंब लागणार आहे. 

इन्व्हर्टरसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सौरऊर्जा प्रकल्प पूर्ववत सुरू होईल.
- प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivshahi Bus: एसटीच्या ‘शिवशाही’ला कायमचा ब्रेक लागणार! आता MSRTC च्या 'या' बसेस रस्त्यावर धावणार; प्रशासनाचा मोठा निर्णय

Who is Auqib Nabi? रणजी स्पर्धेत ५५ विकेट्स घेणारा, वेगाचा नवा बादशाह... दिनेश कार्तिकने केले कौतुक; भारतीय संघात तो हवा...

बिग बॉसची स्पर्धक तन्वी कोलतेला मोठा धक्का, इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब!

Company Bonus Video: पैसेच पैसे! टेबलावर ठेवले २४० कोटी अन् म्हणाला मोजता येतील, तेवढे उचला

T20 WC, WI vs SA: विंडीजने दाखवली ताकद, शेफर्ड - होल्डरची विश्वविक्रमी भागीदारी अन् द. आफ्रिकेसमोर मोठं लक्ष्य; भारताची धाकधुक वाढली

SCROLL FOR NEXT