Prajakta Mali Sakal
पुणे

प्राजक्ता माळीचा जमीनीचा दिवाणी दावा लोकअदालतीत निकाली

मृत्यूपत्राद्वारे आत्याला मिळालेल्या जमीनीची मालकी हक्क मिळण्याबाबत दाखल असलेले अभिनेत्री प्राजक्ता माळी दावा लोकअदालतीत तडजोडीद्वारे निकाली लावण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मृत्यूपत्राद्वारे आत्याला मिळालेल्या जमीनीची मालकी हक्क मिळण्याबाबत दाखल असलेले अभिनेत्री प्राजक्ता माळी दावा लोकअदालतीत तडजोडीद्वारे निकाली लावण्यात आले. आजोबांनी आत्याला मृत्यूपत्राद्वारे दिलेल्या जमिनीबाबत प्रोबेट झालेले होते. संबंधित जमीन प्राजक्ता हिने विकत घेतली आहे.

या प्रकरणात प्राजक्ता यांनी ॲड. अश्‍विनी ललीत खंडाळे यांच्यामार्फत लोकअदालतीत दावा दाखल केला होता. त्यानुसार शनिवारी झालेल्या लोकअदालतील हे प्रकरण तडजोड करून निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आले. प्राजक्ता यांचे आजोबा नारायण माळी यांनी धनकवडी येथील एका जागेबाबत १२ नोव्हेंबर २००३ रोजी मृत्युपत्र तयार केले होते. त्यानुसार संबंधित जागा त्यांची मुलगी मंगला फुगे यांना देण्यात आली होती. संबंधित मृत्यूपत्राच्या प्रोबेटसाठी व मिळकतीच्या अंमलबजावणीसाठी फुगे यांनी येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. प्रोबेट संदर्भात झालेला आदेश हा या प्रकरणातील वादी व प्रतिवादी यांनी मान्य केले होते.

संबंधित जमीन ही फुगे यांच्याकडून प्राजक्ता हिने खरेदी केली आहे. या मिळकतीबाबदल या प्रकरणातील वादी आणि प्रतिवादी यांची कोणतीही हरकत नाही. तसेच भविष्यात राहणार नाही. त्यामुळे या प्रकरणातील मिळतीबाबत कोणताही आक्षेप नसल्याने हे प्रकरण मागे घेवुन मिटवत असल्याचे तडजोड पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यानुसार लोकअदालतील दिवाणी न्यायालयाच्या पॅनेलने हे प्रकरण निकाली काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला प्रतिकिलो ३० रुपये बाजारभाव

PI Ranjankumar Sharma : हलगर्जीपणा करणाऱ्यांचे थेट निलंबन; गुन्हेगारांचे कंबरडं मोडणार, दृष्य पोलिसिंगवर अधिक भर

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे दोषी; मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा यावर सोमवारी निकाल

SCROLL FOR NEXT