Prakash Ambedkar 
पुणे

Prakash Ambedkar: राज्यात ३ डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता; प्रकाश आंबेडकर यांचे धक्कादायक वक्तव्य

Sandip Kapde

Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन केले. महात्मा फुले यांनी जो लढा सुरू त्याची फळे आपण चाकतो आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. तसेच राज्यात ३ डिसेंबरनंतर राज्यात अनेक ठिकाणी दंगलीची शक्यता असल्याचे वक्तव्य केले आहे.

धार्मिक हस्तक्षेप होत आहे आणि आमच्या वैदिक धर्मावर आघात होत आहे. असा ज्यांनी कांगावा केला होता. त्यांनी आता देशात हिंदूंचे राज्य असून देशाला हिंदूराष्ट्र कराव, संबोधित करावं, असा नवीन कांगावा सुरु केला आहे. याचे गांभीर्य कुणाच्या लक्षात आलं नसेल पण पुन्हा देशात वैदिक परंपरा सुरू कराव्या. संविधान बदलणार अशी घोषणा केली जात आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आरएसएस, विश्व हिंदू परिषद यावर बोलत नाही आहे. पण देवेंद्र फडणवीस यांना संघाच्या कार्यकारणीत प्रांत प्रतिनिधी पदापर्यंत जाता आलं नाही. ते आज सांगतात मी असताना संविधान बदलणार नाही. माझ्या मते रस्त्यावरील माणूल कितीही ओरडला तर त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे. जे ते बोललेत ते मोहन भागवत यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

३ डिसेंबरनंतर राज्यात अनेक ठिकाणी दंगलीची शक्यता आहे.  प्रत्येक पोलीस स्टेशनला सतर्क करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत ६ डिसेंबर नंतर काहीही घडू शकते, अशी पोलिसांना सुचना देण्यात आली आहे.  चार राज्याच्या निवडणूका झाल्यानंतर घडेल. देशात मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केलं जात आहे, ओबीसींनी सतर्क राहावं,  असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मोदी सरकारला धक्का! निवडणूक आयुक्तांबाबतच्या कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाची नोटीस, मागितलं उत्तर

Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभवला वर्ल्ड कप स्पर्धेत ५ मोठे विक्रम मोडण्याची संधी; विराट, शिखर, शुभमन यांचे विक्रम तुटणे निश्चित

Labor Law Changes: Layoff झाला तरी खात्यात पैसे येणार? ‘पुनर्कौशल्य निधी’मुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Kolhapur Election : ‘लाडकी बहीण’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसला बहिणीच धडा शिकवतील; खासदार धनंजय महाडिकांचा थेट हल्लाबोल

Mohol Politics: स्वीकृत नगरसेवकासाठी भाजपचे दोन डझन इच्छुक; उपनगराध्यपदाची लॉटरी कोणाला लागणार? मोहोळकरांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT