पुणे

प्रकृती डायग्नोस्टिक सेंटरच्या अध्यक्षपदी डॉ. जयदीप चव्हाण

CD

प्रकृती डायग्नोस्टिक सेंटरच्या अध्यक्षपदी डॉ. जयदीप चव्हाण

व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. शशिकांत कदम यांची नियुक्ती

सातारा, ता. २ : नागठाणे येथील प्रकृती डायग्नोस्टिक सेंटर प्रायव्हेट लिमिटेडच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ नुकताच उत्साहात झाला. यामध्ये अध्यक्षपदी डॉ. जयदीप चव्हाण यांची, तर व्यवस्थापकीय संचालकपदी तारळे येथील डॉ. शशिकांत कदम यांची नियुक्ती करण्यात आली.
या पदग्रहण समारंभात संचालकपदी डॉ. विकास घाडगे, डॉ. भानुदास सुतार, डॉ. राहुल आनंदे आणि डॉ. भरत सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधाकर बेंद्रे, माजी अध्यक्ष डॉ. अनिल पवार, डॉ. संभाजी ढाणे, डॉ. संदीप निकम, डॉ. विजय जाधव, डॉ. नितीन महाडिक, डॉ. शंकर साळुंखे, डॉ. रवींद्र ढाणे, रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. ऐश्वर्या थोरात-बोकील, मेट्रोपोलिसचे दिनेश पोतदार, तसेच सेंटरचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गेली २२ वर्षे प्रकृती डायग्नोस्टिक सेंटर नागठाणे व परिसरातील रुग्णांना दर्जेदार आणि अत्याधुनिक वैद्यकीय तपासणी सुविधा उपलब्ध करून देत आहे. सोनोग्राफी, टू डी इको, एक्स-रे, ईसीजी तसेच पॅथॉलॉजी विभागातील रक्त व लघवीच्या विविध तपासण्या अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे हे सेंटर परिसरातील एक महत्त्वाचे आरोग्य केंद्र म्हणून नावारूपास आले आहे. नव्या नेतृत्वाखाली नागठाणे परिसराच्या आरोग्यसेवेत एक नवे पर्व सुरू होणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

डॉ. जयदीप चव्हाण- W63493
डॉ. शशिकांत कदम -W63497

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Court Bomb Threat Today : सातारा जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ई-मेलमुळे उडाली खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Virat Kohli Records: न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहली रचणार इतिहास? तीन मोठे विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी; कोणते आहेत रेकॉर्ड्स?

नेतान्याहूंचा ट्रम्प यांच्यावर दबाव, सात दिवसांत इराणवर अण्वस्त्र हल्ला! अमेरिकेतील वरिष्ठ पत्रकाराचा मोठा दावा, जगभरात खळबळ...

Latest Marathi News Live Update : राम मंदिरातील देणग्यांच्या कथित चोरीप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Mumbai Food Poisoning: लग्नाच्या जेवणातून ७०-१०० जणांना विषबाधा, वधू-वरासह वऱ्हाडी रुग्णालयात दाखल; मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT