Prashant Bamb asked for information about bogus surgeries of teachers in Pune  esakal
पुणे

Prashant Bamb : पुणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या बोगस शस्त्रक्रियांची बंब यांनी मागविली माहिती

आमदार बंड यांचे पुणे झेडपीचे सीईओ आयुष प्रसाद यांना पत्र

गजेंद्र बडे -सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील किती शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये सूट मिळावी किंवा आपल्या सोईनुसार हव्या त्या शाळेवर नियुक्ती मिळावी, यासाठी किती शिक्षकांनी बोगस शस्त्रक्रिया आणि अंतराबाबतचे बोगस दाखला आणि दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले, याची गाव आणि शाळानिहाय माहिती देण्याची मागणी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी पुणे जिल्हा परिषदेकडे केली आहे. या मागणीसाठी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना पत्र पाठवले आहे. बंब यांच्या या पत्राने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.

आमदार बंब यांनी १० डिसेंबर २०२२ ला आयुष प्रसाद यांना हे पत्र दिले आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या सध्याच्या चालू बदली प्रक्रियेत किती शिक्षकांनी शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. यापैकी किती जणांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी अर्जित रजा घेतलेल्या नाहीत आणि किती जणांनी अंतर आणि दिव्यांगांबाबतचे बोगस प्रमाणपत्र सादर केले आहे, आदी मुद्यांबाबतची गाव व शाळानिहाय माहिती देण्याची मागणी बंब यांनी या पत्राद्वारे आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे.

पुणे जिल्ह्यातील काही शिक्षकांनी चार संवर्गापैकी पहिल्या दोन संवर्गात बदलीतून सूट मिळण्यासाठी कोणी बोगस घटस्फोट, कोणी बोगस शस्त्रक्रिया तर कोणी अंतराचा बोगस दाखला सादर केल्याचे वृत्त सकाळने ४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे खुद्द शिक्षकांनीच तक्रारी केल्या होत्या. या बातमीची गंभीर दखल घेत बंब यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे पत्र पाठविले आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. या बदल्यांमध्ये संवर्ग एकमध्ये दिव्यांग, पक्षघाताने आजारी, हृद्य शस्त्रक्रिया झालेले, यकृत प्रत्यारोपण, कर्करोगाने ग्रस्त, मेंदूचा आजार किंवा शस्त्रक्रिया झालेले आजी-माजी सैनिकांचे पाल्य, विधवा, अविवाहित शिक्षिका, घटस्फोटित, परित्यक्ता आदी श्रेणीतील शिक्षकांचा तर, संवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाच्या मुद्यांचा समावेश आहे. यापैकी कोणताही एका प्रकारात येत असलेल्या शिक्षकांना एकतर त्यांच्या इच्छेनुसार सोईची शाळा मिळते किंवा बदलीतून सूटही मिळविता येते. याचा फायदा घेण्यासाठी काही शिक्षकांनी जाणीवपूर्वक ही बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप शिक्षकांनीच केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT