पुणे

प्रतापगड पर्व

CD

PNE26W30184
सोलापूर : हुतात्मा स्मृती मंदिरात ‘प्रतापगड पर्व’ कार्यक्रम सादर करताना कलावंत.
---
‘प्रतापगड पर्व’मधून शिवचरित्राचा संगीतमय जागर
तरुण कलावंतांनी पोवाडे आणि लोकगीतांतून उलगडला शिवकाल
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २६ : छत्रपती शिवरायांच्या काळातील आदिलशाहीचे राजकारण, शहाजी महाराजांच्या संदर्भातील भूमिका, मोगलांचा उपद्रव अशा अनेक ऐतिहासिक घटनांचे तरुण कलावंतांनी पोवाडे आणि लोकगीतांच्या माध्यमातून प्रभावी संगीतमय सादरीकरण केले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त येथील हुतात्मा स्मृती मंदिरात ‘प्रतापगड पर्व’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला.
शिवराज्याभिषेकापूर्वीचा आदिलशाहीच्या उपद्रवाचा काळ, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारण्यास सुरुवात केल्यानंतर आदिलशाहीने शहाजी महाराजांना कैद केल्याचा प्रसंग, तसेच मोगलांच्या दबावामुळे त्यांची सन्मानाने झालेली सुटका आणि त्याच काळात अफजलखानाचा झालेला उदय यांचे चित्रण गीतांमधून करण्यात आले.
त्यानंतर जावळी मोहिमेचा प्रसंग सादर करण्यात आला. चंद्रराव मोरे यांनी बदफैली लोकांना आश्रय दिल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याविरुद्ध मोहीम उभारली. या मोहिमेत रायरीचा डोंगर, सरदार मुरारबाजी देशपांडे आणि भोरप्याचा डोंगर स्वराज्यात दाखल झाला. पुढे रायरीवर राजगड, तर भोरप्याच्या डोंगरावर अभेद्य प्रतापगड उभारण्यात आल्याचे प्रसंग ढोल-ताशांच्या गजरात सादर करण्यात आले.
---
चौकट
संभाजी महाराजांच्या जन्मप्रसंगाला उत्स्फूर्त दाद
तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असल्याने कार्यक्रमात त्यांच्या जन्मप्रसंगाचेही सादरीकरण करण्यात आले. हा प्रसंग रंगताच उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... पिकअप व्हॅन दरीत कोसळली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

Karad Bus Stand Robbery: कऱ्हाड बसस्थानकातील जबरी चोरी उघडकीस; पती-पत्नी अटक

SCROLL FOR NEXT