पुणे

प्रतीक यादव यांचे निधन

CD

प्रतीक यादव यांचे निधन
समाजवादी पक्षाकडून शोक व्यक्त
लखनौ, ता. १३ (पीटीआय): समाजवादी पक्षाचे नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यांचे धाकटे चिरंजीव, बांधकाम व्यावसायिक प्रतीक यादव (वय ३८) यांचे बुधवारी पहाटे अचानक प्रकृती बिघडल्याने निधन झाले. व्यायामाबाबत सजग आणि प्राणीप्रेमी म्हणून ओळख असलेल्या प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली.
प्रतीक यादव हे मुलायम सिंह यादव आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्र होते. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे त्यांचे सावत्र बंधू होत. राजकीय घराण्यातील सदस्य असूनही प्रतीक यादव यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहणे पसंत केले होते. ते प्रामुख्याने फिटनेस आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असत. माहितीनुसार, बुधवारी पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना लखनौतील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाचे संचालक डॉ. जी. सी. गुप्ता यांनी सांगितले की, त्यांना रुग्णालयात आणले तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रतीक यादव यांच्या पत्नी अपर्णा यादव या भाजप नेत्या असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. घटनेच्या वेळी त्या उत्तर प्रदेशाबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच समाजवादी पक्ष आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते तसेच समर्थक त्यांच्या विक्रमादित्य मार्ग येथील निवासस्थानी जमा झाले. दरम्यान, जानेवारी महिन्यात प्रतीक यादव यांनी सोशल मीडियावर पत्नी अपर्णा यादव यांच्याशी मतभेद असल्याचे म्हटले होते. मात्र काही दिवसांनी त्यांनी दोघांमध्ये मतभेद मिटल्याचे जाहीर केले होते. प्रतीक यादव यांनी ब्रिटनमध्ये एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजकारणाऐवजी बांधकाम क्षेत्राबरोबरच विविध ठिकाणी जीम उभारण्यात वाटा उचलला.
प्रतीक यादव यांचा मृतदेह किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यांच्या निधनाबद्दल समाजवादी पक्षाने सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत दु:ख व्यक्त केले आहे.
-------
आपण अनेक वर्षांपासून प्रतीक यादव यांना ओळखत होतो. प्रतीक यांच्यासारखा तंदुरुस्त व्यक्ती इतक्या अचानकपणे निघून गेला, यावर अजूनही विश्वास बसत नाही.
धीरेंद्र यादव, राष्ट्रीय सरचिटणीस, समाजवादी शिक्षक सभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT