Pratibha Aher Sakal
पुणे

स्वत:बरोबरच सासूबाईंना काढले आजारातून बाहेर

‘माझ्यासह ५८ वर्षीय सासूबाईंचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डोक्यावर आकाशच कोसळले. कोरोनाचा राक्षस गिळंकृत करू पाहतोय ही नैराशेची भावना निर्माण झाली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘माझ्यासह ५८ वर्षीय सासूबाईंचा अहवाल पॉझिटिव्ह (Positive Report) आल्याने डोक्यावर आकाशच कोसळले. कोरोनाचा राक्षस गिळंकृत करू पाहतोय ही नैराशेची भावना निर्माण झाली. मात्र, मन खंबीर करून कोणताही वाईट विचार मनात येऊ न देता सकारात्मकतेच्या जोरावर कोरोनाला (Corona) हरविण्याचा दृढ निश्चय केला. कुटुंबाला (Family) आधार देत योग्य वेळी उपचार (Treatment) घेतले व केवळ आठ दिवसांतच बरी झाले,’’ असा अनुभव सांगत होत्या भोसरी येथील गृहिणी (Pratibha Aher) प्रतिभा आहेर... (Pratibha Aher Coronavirus Sickness Recovery)

प्रतिभा यांचे पती आयटी कंपनीत नोकरी करतात. लक्षणे आढळल्याने आहेर कुटुंबीयांनी त्वरित कोरोनाची तपासणी केली. त्यात प्रतिभा आणि त्यांच्या सासूबाईंना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला.

जास्त त्रास होत नसल्याने सहा महिन्यांची मुलगी आर्वी आणि सहा वर्षांचा मुलगा अंकित यांच्यामुळे घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला. काळजावर दगड ठेवत मुलांना स्वत:पासून वेगळे ठेवले. आपल्यामुळे त्यांना संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली व सकारात्मकतेच्या बळावर स्वतः व सासूबाईंना आजारातून बाहेर काढल्याचे प्रतिभा यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

लक्षणे दिसताच चाचणी करून घेणे गरजेचे

लक्षणे दिसून आल्यानंतर त्वरित सर्वांनी चाचणी केली. कोरोनाचा धोका वाढण्याच्या आधीच उपचार सुरू केल्याने आम्हाला जास्त त्रास झाला नाही. या काळात केवळ मुलांची व स्वतःच्या तब्येतीची चिंता करत बसण्यापेक्षा बरे होण्याच्या सकारात्मक विचारांवर अधिक भर दिला. दृढ निश्चय निर्माण केल्याने कोरोना विरुद्धची लढाई जिंकल्याचे प्रतिभा आहेर यांनी आनंदाश्रू पदराने टिपत सांगितले.

कोरोना काळात आईकडे जाता येत नाही म्हणून मुलीने अनेकदा टाहो फोडला. मुलाचीदेखील तीच अवस्था होती. दोघेही माझ्याकडे राहात होते. मात्र, चिमुकल्यांनी आईने जवळ घ्यावे म्हणून अनेकदा घर डोक्यावर घेतले. योग्य काळजी घेत मुलीला केवळ स्तन्यपानासाठी आईकडे पाठवावे लागत होते.

- श्याम आहेर, प्रतिभा यांचे पती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT