Pratibha Sangam is the 19th state level literary convention Akhil Bharatiya Vidyarthi Parishad and Rashtriya Kala Manch pune sakal
पुणे

‘प्रतिभा संगम’ हे १९ वे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन

या कार्यक्रमा अंतर्गत मंगळवारी (ता. १७) ग्रंथ दिंडी आणि त्यांनतर संमेलनाचे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि राष्ट्रीय कला मंच यांच्या वतीने ‘प्रतिभा संगम’ हे १९ वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमा अंतर्गत मंगळवारी (ता. १७) ग्रंथ दिंडी आणि त्यांनतर संमेलनाचे उद्घाटन पार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील साहित्य प्रेमाला दिशा मिळावी या अनुषंगाने हे संमेलन आयोजित करण्यात येते, अशी माहिती प्रतिभा संगम स्वागत समितीचे स्वागत सचिव श्रीपाद ढेकणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी प्रतिभा संगम स्वागत समितीचे अध्यक्ष प्रदीप रावत, अभाविप पश्‍चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल, आदी उपस्थित होते. हे साहित्य संमेलन मंगळवार (ता. १७) आणि बुधवारी (ता. १८) पर्वती पायथा येथील पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार असून या स्थळाला प्रा. द. मा. मिरासदार साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून विविध विद्यार्थी साहित्यिक या संमेलनात सहभागी होत आहेत. या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात मुख्य उपस्थिती म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉक्टर अरुणा ढेरे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून सदानंद मोरे हे संत साहित्य आणि युवक या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक दिक्पाल लांजेकर यांची मुलाखत असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. असे यावेळी ढेकणे व बाचल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

SCROLL FOR NEXT