Pratiksha Patil
Pratiksha Patil Sakal
पुणे

इंदापूरच्या प्रतिक्षा पाटीलचा अधोमुख श्‍वानासनमध्ये विश्‍वविक्रम

राजकुमार थोरात

इंदापूर तालुक्यातील जांब गावातील प्रतिक्षा सुनिल पाटील या मुलीच्या ७५ मिनिट ४ सेंकद अधोमुख श्‍वानासनाची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुस्तकामध्ये नोंद.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील जांब गावातील प्रतिक्षा सुनिल पाटील या मुलीच्या ७५ मिनिट ४ सेंकद अधोमुख श्‍वानासनाची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुस्तकामध्ये नोंद झाली असून अधोमुख श्‍वानासनामध्ये विक्रम केला आहे.

इंदापूर तालुक्यातील जांब या छोट्या गावामध्ये प्रतिक्षा सुनिल पाटील राहत असून एका शेतकऱ्याची मुलगी आहे. आई स्वाती व वडिल सुनिल शेतकरी आहेत. ती वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील भारत चिल्ड्रन्स अॅकॅडमी शाळेमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती. तिला सुरवातीपासुन योग-प्राणायामाची आवड असल्याने तिने अधोमुख श्‍वानासन करण्याचा सराव सुरु केला. सुरवातीला तिला ३१ मिनिटे अधोमुख श्‍वानासन करता येत होते. शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर, पर्यवेक्षक अमोल गोडसे, ज्ञानेश्‍वर जगताप यांनी तिला मार्गदर्शन करुन अधोमुख श्‍वानासनाची वेळ वाढवली. २४ जानेवारी २०२२ रोजी वालचंदनगरमध्ये अधोमुख श्‍वानासनाचा विश्‍वविक्रम करण्यासाठी शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रतिक्षा पाटील हिने ७५ मिनिट ४ सेकंदचाा अधोमुख श्‍वानासन करुन विश्‍वविक्रम केला. सदरच्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या बेवसाईट अपलोड करण्यात आले होते.

गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने प्रतिक्षा पाटील हिचा अधोमुख श्‍वानासनातील ७५ मिनिट ४ मिनिटांचा रेकॉर्डला मान्यता दिली असून ती जगामध्ये सर्वाधिक अधोमुख श्‍वानासन करणारी व्यक्ति ठरली असल्याचे शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांनी सांगितले. यापूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड सेदू राम कुमार यांच्या नावावर असून त्यांनी ६२ मिनिट ३ सेकंदाचा वर्ल्ड रेकॉर्ड १५ ऑक्टोबर २०२१ रोजी केला होता. तसेच त्यापूर्वी अमेरिकेतील किकीप्लायना (KIKI FLYNN) हिने ६० मिनिट १८ सेकंदाच्या वर्ल्ड रेकॉर्ड १६ ऑगस्ट २०२० केला होता. वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी, फॅक्टरी मॅनेजर धीरज केसकर, शाळा समितीचे अध्यक्ष आशिष केसकर, उपाध्यक्ष पांडुरंग कवडे यांनी प्रतिक्षा पाटील हिचे अभिनंदन केले आहे.

ग्रामीण भागातील मुले-मुलीमध्ये अनेक कला, क्रिडा गुण असतात. त्यांना ओळखून त्यांच्या गुणांना वाव देण्याचा आमचा प्रयत्न असतो. प्रतिक्षा पाटील ला प्रोत्साहन दिल्यामुळे ३१ मिनिट अधोमुख श्‍वानासन करणारी मुलीने ७५ मिनिट ४ सेंकद अधोमुख श्‍वानासन करुन वर्ल्ड रेकॉर्ड करु शकली. जिद्द व चिकाटी च्या जोरावर तिने यश मिळविले असून विश्‍वविक्रमसाठी घातलेली गवसनी कौतुकास्पद आहे. आज बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून तिने बारीवीमध्ये उज्वल यश मिळविले असल्याचे शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT