Pravin Tarde
Pravin Tarde Sakal
पुणे

पडद्यामागील कलाकारांसाठी कायमस्वरूपी मदत निधी उभारावा - प्रवीण तरडे

सकाळ वृत्तसेवा

वारजे माळवाडी (Pune) - माझे चित्रपट (Movie) यशस्वी (Success) झाले, त्यामागे पडद्यामागील कलाकारांचा (बॅकस्टेज आर्टीस्टचा) (Backstage Artist) मोठा हात असल्याने मी सामाजिक जाणीवेतून स्वामींच्या कृपेने त्यांना मदत करू शकलो, मात्र संकटकाळासाठी कायमस्वरूपी मदत निधी (Help Fund) उभारणे काळाची गरज असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी केले. (Pravin Tarde says pune Raise a permanent support fund for back stage artists)

क्रिएटिव्ह फाउंडेशन व मुकुलमाधव फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्ध गीतकार व शांताबाई फेम गीतकार संजय लोंढे यांना ही धनादेश व एक महिन्याचे रेशन अशी मदत दिली. तसेच, शंभर कलावंताना मदतीचा हात म्हणून महिनाभराचा किराणा माल दिला. यावेळी तरडे बोलत होते. रविकिरण देसाई व ऋतुजा देसाई यांनी संजय लोंढे यांना पाच हजार रुपयांचा धनादेश दिला. प्रसिद्ध अभिनेते रमेश परदेशी, शिक्षण समिती अध्यक्ष व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मुकुल माधव फाउंडेशनचे बबलू मोकळे, यास्मिन शेख, क्रिएटिव्ह फाउंडेशन विश्वस्त प्रतीक खर्डेकर, कल्याणी खर्डेकर, योगेश सुपेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

संदीप खर्डेकर म्हणाले की, कलाकार आपले मनोरंजन करतो त्याचे दुःख लपवून तो फक्त प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आणि कौतुकाचा भुकेला असतो. मात्र अशा संकट काळात नाटकं, चित्रपट व मालिकांना मोठा फटका बसतो अन अनेक कलावंत जगण्यासाठी धडपडतात. अश्या सर्वांसाठी कर्तव्य म्हणून क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशनने हे मदत कार्य सुरु केले. मुकुलमाधव फाउंडेशनने आतापर्यंत 80 हजार गरजूंना शिधा वाटला आहे. असून यापुढे ही हे कार्य सुरु राहील असे मोकळे यांनी सांगितले.

''माझी आर्थिक सद्यस्थिती नाजूक असून क्रिएटिव्ह फाउंडेशन व समाजाच्या विविध स्तरातून मदत होत आहे. त्याबद्दल मी समाजाचा ऋणी आहे.''

- संजय लोंढे, गीतकार शांताबाई फेम

''प्रवीण तरडे यांनी लॉकडाऊनच्या काळात तब्ब्ल १४ लाख रुपये या बॅकस्टेज कलावंतांसाठी दिले. हा उपक्रम सर्वांनी राबविला पाहिजे. आज संकट काळात कलाकाराला लोकाश्रय मिळाला. पण राजाश्रय कधी मिळणार''

- रमेश ऊर्फ पिट्या परदेशी अभिनेता

मालिका व चित्रपटाच्या चित्रीकरणास परवानगी द्या

निर्माता, दिग्दर्शकांनी नफ्यातील काही वाटा पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी राखीव ठेवावा. पडद्यावर चकाकणाऱ्या गोष्टीच्या मागे हजारो हात असतात. कोरोनाचे संकट असो किंवा इतर संकट त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होतात. त्यांच्या संकटकाळात हा निधी उपयुक्त ठरेल. असे ही तरडे यांनी राज्य सरकारने पडद्यामागील कलाकारांचा विचार करून अन्य राज्यांप्रमाणे मालिका व चित्रपटाच्या चित्रीकरणास परवानगी द्यावी. अशी मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT