Tree-Cutting 
पुणे

Video : पिंपरी चिंचवडमध्ये महावितरणकडून मान्सूनपूर्व तयारी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - दरवर्षी पावसाळ्यात पाऊस झाल्यास महावितरणची सेवा ठप्प होते. परंतु, वीज पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरणने मान्सूनपूर्व कामे  हाती घेतली आहेत. यंदा लॉकडाउनमूळे एमआयडीसी परिसर बंद असल्याने विना अडथळा काम सुरु आहे.

मान्सूनपूर्व कामांमध्ये महावितरणने विद्युत खांबालगत असलेल्या झाडांच्या फांद्याची कटाई, डीपीवरील वेली काढण्याचे काम, महावितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, विजेचे खांबांसह काही ठिकाणी विजेच्या तारा बदलण्याची कामे सुरु केली आहेत. याशिवाय येत्या दोन आठवड्यांत तुटलेले पीन आणि डिस्क इन्सुलेटर्स बदलण्याची कामे केली जाणार आहे. ऑइल फिल्ट्रेशन, उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, विजेचे खांब आणि तारांचे मजबुतीकरण, विजेचे खांब आणि तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे आदी कामेही पूर्ण करण्यात येत आहेत.

दरम्यान, महावितरण खराळवाडी उपविभाग अंतर्गत खराळवाडी परिसरात खराळवाडी, मोरवाडी, ऑटोक्लस्टर, पिंपरी, भाटनगर या परिसरात महावितरणकडून मान्सूनपूर्व काम पूर्ण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जीआर आला! लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; आता 'अशी' चूक पुन्हा करु नका

"ते माझ्या पाठीवरून हात फिरवायचे.." मराठी अभिनेत्रीला सिनियर कलाकाराचा चुकीचा स्पर्श ; "मी मोठ्याने बोलले.."

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषदच्या 73 जागांसाठी उद्या मतदान

Malaysia Job Portal: विदेशात नोकरीची सुवर्णसंधी! जॉब पोर्टल लाँच झाल्याने मलेशियात एजंटशिवाय मिळणार जॉब

Pashan News : पीएमपीच्या थांब्याअभावी प्रवाशांचे हाल; पाषाण-सूस रस्त्यावरील स्थिती; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT