पुणे

पश्चिम विदर्भात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; उकाड्यापासून अल्प दिलासा, संत्रा व आंबा उत्पादक चिंतेत

CD

पश्चिम विदर्भात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

उकाड्यापासून अल्प दिलासा, संत्रा व आंबा उत्पादक चिंतेत

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : पश्चिम विदर्भातील विविध भागांत शनिवारी (ता.९) मध्यरात्रीनंतर सकाळ दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा मान्सून पूर्व पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा दुपारपर्यंत खंडित होता. तीव्र उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी संत्रा आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः संत्रा बागांचा ‘ताण’ तुटण्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम विदर्भात तापमानाने उच्चांक गाठला असून नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. अशात शनिवारी पहाटे अचानक पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला. अकोला शहरासह तेल्हारा तालुक्यात पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात डोणगाव परिसरातही पावसाची नोंद झाली. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पहाटे साडेचारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जवळपास तासभर पाऊस कोसळला. ४४ अंश सेल्सिअस तापमानाने अंगाची लाहीलाही होत असताना या पावसामुळे उकाड्यापासून काहीशी सुटका झाली. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तसेच संत्रा उत्पादकांसाठी हा पाऊस धोक्याचा इशारा मानला जात आहे. सध्या संत्रा बागा आगामी बहरासाठी ताणावर ठेवण्यात आल्या आहेत. अशावेळी झालेल्या पावसामुळे बागांचा ताण तुटण्याची शक्यता असून पुढील बहर प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात. दरम्यान, या पावसामुळे मान्सूनपूर्व शेतीकामांना वेग येण्याची शक्यता असून हळद लागवडीसाठी तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे


प्रतिक्रिया...
“ सध्या संत्रा उत्पादकांनी बागा ताणावर सोडल्या आहेत. काल रात्रीच्या पावसामुळे हा ताण तुटण्याची भीती आहे. पुन्हा पाऊस झाल्यास संत्रा बागायतदारांसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते,”
-गोपाल बोरकर, संत्रा उत्पादक, वडजी, जि. वाशीम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT