School Start Sakal
पुणे

पुणे : तब्बल दोन वर्षांनी पूर्व प्राथमिक शाळा ‘अनलॉक’

तब्बल दोन वर्षांनंतर कुलूप उघडण्याची परवानगी मिळालेल्या पूर्व प्राथमिक शाळा बुधवारी चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या.

सकाळ वृत्तसेवा

तब्बल दोन वर्षांनंतर कुलूप उघडण्याची परवानगी मिळालेल्या पूर्व प्राथमिक शाळा बुधवारी चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या.

पुणे - तब्बल दोन वर्षांनंतर कुलूप उघडण्याची परवानगी मिळालेल्या पूर्व प्राथमिक शाळा (Pre-Primary School) बुधवारी चिमुकल्यांच्या (Children) किलबिलाटाने गजबजल्या. शहरातील नर्सरी, छोटा गट (ज्युनियर केजी) आणि मोठा गट (सिनियर केजी) हे वर्ग सुरू झाल्याने मुलांनी उत्साहात शाळेत (School) हजेरी लावली. शाळांनीही आकर्षक सजावट करत आणि कोरोनासंबंधी आवश्यक खबरदारी घेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळांना टाळे लागले होते. त्यानंतर संसर्ग कमी असताना माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्यात येत होत्या. पण पूर्व प्राथमिक शाळा मात्र बंदच होत्या. परंतु, आता दोन वर्षांनंतर पूर्व प्राथमिक शाळांना वर्ग खुले करण्याची परवानगी मिळाल्याने मुलांना प्रत्यक्ष शाळेत येण्याची संधी मिळाली. या काळात शाळेत प्रवेश घेऊनही मुलांनी प्रत्यक्ष शाळेत येता आले नाही. त्यामुळे बुधवारी हजारो विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवले. शाळांनीही फुलांची सजावट करून, फुगे लावून, मुलांना चॉकलेटचे वाटप करून आणि औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

काही शाळांमध्ये मुलांनी बगीच्यातील झोका, घसरगुंडी आणि सायकल खेळण्याचा आनंद घेतला. तर काही ठिकाणी विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत नटून आले होते. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसराचे निर्जंतुकीकरण, सॅनिटायझरची व्यवस्था शाळांनी केली होती. मुलांनाही मास्कचा वापर करण्यास व थोड्या-थोड्या वेळाने हात धुण्याच्या सूचना शिक्षक देत होते.

‘शाळा सुरू झाल्यावर पहिल्या दिवशी प्रवेश घेतलेल्या सर्व मुलांनी हजेरी लावली होती. पालकांनी सूचना दिल्याने मुलांनी पूर्ण वेळ मास्क परिधान केला होता. खूप दिवसांनी शाळेत यायला मिळाल्याने मुलेही उत्साहात होती. पुष्पवृष्टी करून आणि चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत केले. पहिलाच दिवस असल्याने अभ्यास फार न घेता त्यांच्याशी संवाद साधण्यावर भर दिला.’

- मधुरा चौधरी, मुख्याध्यापिका, सारथी प्राथमिक शाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT